अलिबाग ट्रीप, ताज हॉटेलमध्ये.., डॉक्टर तरुणी फैजुलवर कशी भाळली? चिठ्ठीतून सगळी Love Story समोर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
८ मार्च रोजी मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात स्तुती सोनवणे नावाच्या एका डॉक्टर तरुणीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला होता. आता तिची लव्ह स्टोरी समोर आली आहे.
मुंबई: ८ मार्च रोजी मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात स्तुती सोनवणे नावाच्या एका डॉक्टर तरुणीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला होता. तिने घरात कुणीच नसताना बेडरुममध्ये ओढणीने गळफास लावून जीवन संपवलं. मृत्यूआधी तिने सहा पानांची सुसाईड नोट लिहिली होती. या चिठ्ठीत तिने आपल्या मनातील वेदनांना मोकळी वाट करून दिली. आरोपी प्रियकर फैजुल खानसोबत पहिली भेट कुठे झाली? दोघांच्या प्रेमाची सुरुवात कशी झाली? याचा सगळा तपशील तिने चिठ्ठीत नमूद केला आहे.
डॉक्टर स्तुती सोनवणेनं सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं?
सुरुवातीला गोड गोड वाटणारं प्रेम टॉक्सीक कसं झालं? याची सविस्तर माहिती तरुणीने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सांगितलं आहे. फैजुल खानला उद्देशून लिहिलेल्या चिठ्ठीत स्तुती सोनवणेनं सांगितलं की, तिची फैजुलसोबत पहिली भेट मुंबईच्या दादर इथं झाली होती. पहिल्या भेटीत दोघांनी बराच वेळ वॉक करत गप्पा मारल्या होत्या. पिझ्झा खाल्ला होता. यातूनच दोघांची छान मैत्री झाली होती.
advertisement
ताज हॉटेलमध्ये वाढदिवस
यानंतर फैजुलने स्तुतीचा वाढदिवस मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये साजरा केला होता. त्याने स्वत: ही खोली सजवली होती. अशाप्रकारे विशेष वागणूक दिल्याने स्तुती फैजुलवर भाळली होती. तिने याबाबत स्वत: खुलासा केला आहे. ताज हॉटेलमध्ये केलेला बर्थडे मी कधीच विसरू शकत नाही. कुणी मला इतकं खास वागवेल, याची कधी कल्पनाही केली नव्हती, असंही तिने चिठ्ठीत म्हटलं आहे.
advertisement
अलिबागची ट्रीप आणि बाईक राईड्स
याशिवाय, अलिबागची ट्रीप, बाईक राईड्सचा उल्लेख तिने सुसाईड नोटमध्ये केला आहे. रविवारच्या भेटी, डान्स करत बनवलेले रिल्स, बॅडमिंटन खेळताना घालवलेले क्षण अशा अनेक घटनांचा तिने नोटमध्ये उल्लेख केला आहे. या प्रमाचे अशी गोड गोड सुरुवात झाली असली तरी सुसाईडचा पुढचा भाग अत्यंत भीतीदायक आणि टॉक्सीक आहे.
advertisement
'आम्हाला तुझं शरीर फ्रीझमध्ये पाहायला आवडणार नाही'
तिने आपला प्रियकर फैजुल खानवर अनेक आरोप केले आहेत. पुरुषी अहंकार, सतत होणारा अपमान, मारहाण होण्याची भीती या सगळ्याचा उल्लेख तिने नोटमध्ये केला आहे. शिवाय आपण समोर असतो तर तू मला मारलंच असतं. रिलेशनशिपमध्ये असतानाही फैजुलच्या मोबाईलमध्ये डेटींग अॅप होता, असंही तिने म्हटलं आहे. तसेच त्याला दारुचं आणि सिगरेटचं व्यसन होतं. तो प्रचंड रागीट होता. यामुळे आपले मित्र मैत्रिणी मस्करीत आपल्याला कधी तरी म्हणायचे, 'आम्हाला तुझं शरीर फ्रीझमध्ये पाहायला आवडणार नाही' तेव्हा मला त्यांचं बोलणं चुकीचं वाटायचं पण ते कदाचित बरोबर होते, असंही तरुणीने नोटमध्ये म्हटलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 12, 2026 2:35 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
अलिबाग ट्रीप, ताज हॉटेलमध्ये.., डॉक्टर तरुणी फैजुलवर कशी भाळली? चिठ्ठीतून सगळी Love Story समोर










