देवाकडे हवं ते माग! गर्लफ्रेंडने मागितलं असं काही, ऐकून बॉयफ्रेंडच्या चेहऱ्याचा रंगच उडाला

Last Updated:

Girlfriend Boyfriend Video : एरवी तुम्हाला हा डायलॉग माहिती आहे 'तू माझी नाही झालीस तर तुला कुणाचीच नाही होऊ देणार, पण या मुलीने तर हाइटच केली.

News18
News18
नवी दिल्ली : देवासमोर आपण हात जोडतो आणि प्रार्थना करतो. प्रत्येकाची प्रार्थना वेगवेगळी असते. कुणी सुखासाठी, कुणी यशासाठी, कुणी पैशांसाठी प्रार्थना करतं. कुणी स्वतःसाठी तर कुणी दुसऱ्यासाठी प्रार्थना करतं. देवाला प्रार्थना करतानाचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
एका कपलचा हा व्हिडीओ आहे, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड दोघंही देवाकडे प्रार्थना करत आहेत. तरुण तरुणीला बोलतो की तुला जे हवं आहे ते देवाकडे माग." यानंतर मुलगी लगेच हात जोडते आणि देवाला म्हणते, "देवा जर तो माझा नसेल तर त्याला तुझा बनव."
advertisement
यानंतर व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला 'आये जी मंगल भवन अमंगल हरी'  वाजायला सुरुवात होतं. मुलाच्या चेहऱ्याचा रंगच उडतो.  देवाचं आवडतं बनणं म्हणजे ती अप्रत्यक्षरित्या मृत्यूचीच प्रार्थना करते. मुलीने प्रार्थना केली आहे की जर मुलगा तिचा झाला नाही तर त्याने मरावं.
एरवी तुम्हाला हा डायलॉग माहिती आहे तू माझी नाही झालीस तर तुला कुणाचीच नाही होऊ देणार. पण या मुलीने तर हाइटच केली. तिने आपला बॉयफ्रेंड आपला नाही होणार तर थेट देवाकडेच पाठवण्याची सोय केली.
advertisement
हा व्हिडिओ @user_vishuuuu या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट आल्या आहेत. अनेक युझर्सनी मुलीची प्रार्थना योग्य असल्याचं म्हटलं आहे. ही उत्तम कल्पना आहे, भावाची सेटिंग लावलेली आहे, अशा कमेंटही इतर युझर्सनी केल्या आहेत.
advertisement
व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा. तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
सूचना : हा लेख फक्त व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठी याचं समर्थन करत नाही किंवा कुणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देशही न्यूज18मराठीचा नाही.
view comments
मराठी बातम्या/Viral/
देवाकडे हवं ते माग! गर्लफ्रेंडने मागितलं असं काही, ऐकून बॉयफ्रेंडच्या चेहऱ्याचा रंगच उडाला
Next Article
advertisement
Eknath Shinde Sharad Pawar : शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', पाहा Video
शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'',
  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

View All
advertisement