advertisement

गोरखपूर दर्शन सोपं, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, पुण्यातून 176 फेऱ्या वाढवल्या, पाहा वेळापत्रक

Last Updated:

Railway Update: पुण्यातून उत्तर भारतात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.

Central Railway: गोरखपूर दर्शन सोपं, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, पुण्यातून 176 फेऱ्या वाढवल्या, पाहा वेळापत्रक
Central Railway: गोरखपूर दर्शन सोपं, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, पुण्यातून 176 फेऱ्या वाढवल्या, पाहा वेळापत्रक
पुणे: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत अनेकजण फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. प्रवासासाठी कमी खर्चात आणि आरामदायी पर्याय म्हणून रेल्वेला मोठी गर्दी असते. पुण्यातून उत्तर भारतात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. गोरखपूर, दानापूरसाठी धावणाऱ्या गाड्यांचा कालावधी वाढवण्यात आला असून अतिरिक्त 176 फेऱ्या चालवण्यात येतील, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
पुणे-गोरख-पुणे आणि पुणे-दानापूर-पुणे या दोन्ही गाड्यांचा कालावधी एक महिन्याने वाढवण्यात आला आहे. त्यामुळे या गाड्यांच्या प्रत्येकी 44 फेऱ्या अतिरिक्त होतील, असे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
पुण-गोरखपूर 44 अतिरिक्त फेऱ्या
पुणे- गोरखपूर-पुणे दैनिक विशेष गाड्यांच्या एकूण 44 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यानुसार ट्रेन क्रमांक 01415 ही विशेष गाडी दि. 10 ते 31 मार्चच्या दरम्यान पुणे येथून दररोज सुटेल. सकाळी 06:50 वाजता ही गाडी गोरखपूरसाठी रवाना होईल. तर दुसऱ्या दिवशी सायंकाळी चार वाजता तिथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01416 ही विशेष गाडी दि. 11 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान गोरखपूर येथी संध्याकाळी साडेपाच वाजता सुटेल आणि पुण्यात तिसऱ्या दिवशी सव्वातीन वाजता पोहोचेल.
advertisement
पुणे-दानापूर ट्रेन
पुणे-दानापूर-पुणे दैनिक विशेष गाडीच्या फेऱ्या देखील वाढवण्यात आल्या आहेत. ही विशेष गाडी देखील 10 ते 31 मार्च दरम्यान पुणे येथून दररोज साडेतीन वाजता सुटेल आणि दानापूर येथे तिसऱ्या दिवशी पहाटे पोहोचेल. तर दानापूर येथून 12 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान दररोज पहाटे गाडी सुटेल आणि पुण्यात दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6.05 वाजता पोहोचेल. रेल्वेचं वेळापत्रक पाहून प्रवाशांनी नियोजन करावं, असं आवाहन करण्यात आलंय.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
गोरखपूर दर्शन सोपं, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, पुण्यातून 176 फेऱ्या वाढवल्या, पाहा वेळापत्रक
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement