advertisement

Kundali Matching : लग्नासाठी 36 पैकी 36 गुण जुळणं धोक्याचं आणि जुळलेच तर...

Last Updated:

पती-पत्नीचं पटत असेल तर यांचे 36 गुण जुळतात असं म्हणतात. ज्यांचे 36 गुण जुळतात त्या जोडप्यांचा संसार चांगला होतो, अशा गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. पण प्रत्यक्षात तसं नाही. याबाबत सविस्तर जाणून घेण्याआधी ते 36 गुण कोणते ते पाहुयात.

36 गुण जुळणं धोकादायक
36 गुण जुळणं धोकादायक
मुंबई :  लग्न जमवतात जन्मपत्रिका पाहिली जाते आणि दोघांचे गुण जुळवले जातात. पत्रिका जुळली नाही तर लग्न करत नाहीत. सामान्यपणे 36 गुण असतात. हे 36 पैकी 36 गुण जुळणं तसं दुर्मिळच. पण खरंतर 36 गुण जुळणं अशुभ मानलं जातं. मग किती गुण जुळायला हवेत? 36 गुण जुळले तर त्याचा काय परिणाम होईल? ते जाणून घेऊयात.
पती-पत्नीचं पटत असेल तर यांचे 36 गुण जुळतात असं म्हणतात. ज्यांचे 36 गुण जुळतात त्या जोडप्यांचा संसार चांगला होतो, अशा गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. पण प्रत्यक्षात तसं नाही. याबाबत सविस्तर जाणून घेण्याआधी ते 36 गुण कोणते ते पाहुयात.
36 गुण कोणते?
advertisement
पत्रिकेतील 36 गुण जुळायला हवेत, असे तुम्ही ऐकले असेल. मात्र ते 36 गुण कोणते आहेत, ते जाणून घ्या.
नाडी - आठ गुण
भकुटाचे गुण- सात
गण मैत्री - सहा गुण
ग्रह मैत्री - पाच गुण
advertisement
योनी मैत्री - चार गुण
ग्रहबळ - तीन गुण
वश्य - दोन गुण
वर्ण - एक गुण
किमान किती गुण जुळायला हवेत?
पत्रिकेत एकूण 36 गुण असतात. त्यापैकी मुलगा आणि मुलीचे निम्मे म्हणजेच किमान 18 गुण जुळणं आवश्यक असतं. यापेक्षा कमी गुण जुळत असतील तर ते लग्न यशस्वी होण्याची शक्यता कमी होते. लग्न मोडण्याची भीती कायम असते. त्यामुळे जर एखाद्या मुलाचे-मुलीशी 18 पेक्षा कमी गुण जुळत असतील तर लग्न करणं टाळतात.
advertisement
ज्या मुला-मुलीचे 18 ते 25 गुण जुळतात, त्यांचे वैवाहिक जीवन चांगले राहील, असे मानले जाते.
ज्या मुला-मुलीचे 25 ते 32 गुण एकमेकांशी जुळतात, त्यांचे वैवाहिक आयुष्य खूप आनंदी राहील, असे मानले जाते.
advertisement
एखाद्या जोडप्याचे जर 32 ते 36 गुण जुळत असतील तर ते खूप शुभ आणि उत्तम मानले जाते. एवढे गुण जुळणं खूप दुर्मिळ असते. फार कमी लोकांचे एवढे गुण जुळतात.
कोणाचे जुळले होते 36 गुण
भगवान श्रीराम आणि माता सीता यांचे 36 गुणे जुळले होते, असे मानले जाते. मात्र ज्यांचे एकमेकांशी 36 पैकी 36 गुण जुळतात, त्यांनी एकमेकांशी लग्न करणं शुभ नसतं. 36 गुण जुळत असल्यामुळे भगवान राम आणि सीता माता यांना त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता, त्यामुळे 36 गुण जुळणं अशुभ मानतात. तसेच प्रभू श्रीराम यांच्या कुंडलीत काही असे योग होते, ज्यामुळे त्यांना वैवाहिक आयुष्यात खूप संकटं आली.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kundali Matching : लग्नासाठी 36 पैकी 36 गुण जुळणं धोक्याचं आणि जुळलेच तर...
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement