समुद्रात कसं उभारतात ब्रीज? खोल पाण्यात सायन्स कसं काम करतं माहितीय?

Last Updated:

आजकाल देशभरात महामार्ग आणि रेल्वे पूल मोठ्या प्रमाणावर बांधले जात आहेत. या पुलांमुळे प्रवास सोपा आणि जलद होतो. पण या पुलांची नींव म्हणजेच पाया खोल पाण्यात कशी बसवली जाते, हे तितकंच अवघड आणि जोखमीचं काम असतं. या कामात थोडीशी चूक झाली तरी संपूर्ण रचना धोक्यात येऊ शकते.

AI generated Photo
AI generated Photo
मुंबई : कधी तुम्ही समुद्रावर किंवा नदीवर बांधलेला एखादा भव्य पूल पाहिला आहे का आणि मनात प्रश्न आला आहे की 'हे लोक एवढ्या खोल पाण्यात ब्रीज बांधतात तरी कसा?' सिमेंट माती ओली असताना ती पाण्यात वाहून कशी जात नाही.
जमिनीवर तर खणून सहज पिलर्स बसवता येतात, पण नदीच्या किंवा समुद्राच्या पाण्यात, वेगवान प्रवाहात आणि चिखलात तसं कसं शक्य होतं? हीच ती गोष्ट जी अनेकांना जाणून घ्यायची उत्सुकता असते.
आजकाल देशभरात महामार्ग आणि रेल्वे पूल मोठ्या प्रमाणावर बांधले जात आहेत. या पुलांमुळे प्रवास सोपा आणि जलद होतो. पण या पुलांची नींव म्हणजेच पाया खोल पाण्यात कशी बसवली जाते, हे तितकंच अवघड आणि जोखमीचं काम असतं. या कामात थोडीशी चूक झाली तरी संपूर्ण रचना धोक्यात येऊ शकते.
advertisement
नद्यांवर पूल बांधताना वापरली जाणारी सर्वात महत्त्वाची तंत्रज्ञान प्रणाली म्हणजे ‘कॉफर्डॅम’ (Cofferdam).
ही एक तात्पुरती जलरोधक रचना असते, जी नदीच्या किंवा समुद्राच्या पाण्याला एका ठराविक भागातून रोखते आणि त्या ठिकाणी काम करण्यासाठी कोरडा भाग तयार करते.
कॉफर्डॅम कसा तयार होतो?
सुरुवातीला इंजिनीअर्स नदी किंवा समुद्राचा सर्व्हे करतात पाण्याची खोली, प्रवाहाचा वेग, आणि नदीतल्या मातीची ताकद मोजली जाते. त्यानंतर पूलाचं डिझाइन ठरतं. किती पिलर्स लागतील आणि त्यांची खोली किती असावी.
advertisement
कॉफर्डॅम तयार करण्यासाठी स्टीलच्या शीट पाइल्स (Sheet Piles) वापरतात. या 10 ते 20 मीटर लांबीच्या असतात आणि हायड्रॉलिक हातोड्याने किंवा वायब्रेटरच्या साहाय्याने नदीच्या किंवा समुद्राच्या तळात ठोकल्या जातात.
या शीट्स एकमेकांना इंटरलॉक करून गोल किंवा चौकोनी भिंत तयार केली जाते, जी पाण्याला आत शिरू देत नाही.
भिंत तयार झाल्यानंतर आतमध्ये मोठमोठे पंप लावले जातात, जे सतत पाणी बाहेर फेकतात. हे पाणी पुन्हा नदीतच सोडलं जातं, जेणेकरून पर्यावरणावर परिणाम होऊ नये.
advertisement
पाणी काढून झाल्यावर आतला भाग पूर्णपणे कोरडा होतो आणि तेथेच पूलाचा पाया बांधण्याचं काम सुरू होतं.
मजूर खाली उतरून रेत, चिखल आणि दगड काढतात. जर तळाची माती कमकुवत असेल, तर ‘पाइल फाऊंडेशन’ तयार केलं जातं लांब लोखंडी पाईप्स नदीत 20 ते 50 मीटर खोलीपर्यंत गाडल्या जातात. त्यावर नंतर कॉंक्रिटचं स्ट्रक्चर उभारलं जातं.
advertisement
या सगळ्या प्रक्रियेत जीवघेणा धोका असतो. जर कॉफर्डॅममध्ये कुठे लीक झालं, भूकंप झाला किंवा पंप बंद पडला, तर सगळं काम वाहून जाऊ शकतं. त्यामुळे या रचनेत सेन्सर्स लावले जातात, जे पाण्याच्या पातळीवर आणि दाबावर सतत लक्ष ठेवतात.
मजुरांना हेल्मेट, लाइफ जॅकेट आणि सुरक्षिततेचं विशेष प्रशिक्षण दिलं जातं.
जेव्हा पाणी फार खोल असतं, तेव्हा कॉफर्डॅमपेक्षा पुढचं तंत्रज्ञान वापरलं जातं ‘कैसन’ (Caisson).
advertisement
ही मोठी जलरोधक बॉक्ससारखी रचना असते, जी हळूहळू नदीत खाली उतरते. दोन प्रकारचे कैसन असतात
ओपन कैसन (Open Caisson): तळाशी उघडा असतो आणि स्वतःच्या वजनाने खाली बसतो. मजूर आत जाऊन खुदाई करतात.
पन्यूमॅटिक कैसन (Pneumatic Caisson): यात हवा दाबाने पाण्याला बाहेर ठेवली जाते. मजूर एअर लॉक मधून एअर चेंबर मध्ये उतरतात, जिथे हवेचा दाब समुद्राच्या तळाएवढा असतो.
advertisement
पूल बांधताना आपण फक्त त्याची सुंदर रचना आणि मजबुती पाहतो, पण त्या मागे शेकडो मजुरांची मेहनत, अभियांत्रिकीचं कौशल्य आणि पाण्याशी झुंज देणारी तंत्रज्ञानाची कमाल दडलेली असते.
view comments
मराठी बातम्या/Viral/
समुद्रात कसं उभारतात ब्रीज? खोल पाण्यात सायन्स कसं काम करतं माहितीय?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement