advertisement

रामचरण, उपासनाच्या जुळ्या मुलांचं नामकरण; अतरंगी नावांच्या ट्रेंडमध्ये खूप विचार करून ठेवलं नाव, खोल आहे अर्थ

Last Updated:
Ram Charan Upasana Twins Baby Names : साऊथ अभिनेता रामचरण आणि त्याची पत्नी उपासना यांनी काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या जुळ्या मुलांचं नामकरण केलं आहे.
1/5
दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण आणि त्यांची पत्नी उपासना कोनिडेला 31 जानेवारी रोजी जुळ्या मुलांचे आईबाब बनले. आता त्यांनी त्यांच्या मुलांचं नामकरण केलं आहे. कुटुंब, जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत हा नामकरण सोहळा पार पडला. अतरंगी, विचित्र नावांच्या ट्रेंडमध्ये रामचरण आणि उपासना यांनी खूप विचार करून आपल्या मुलांचं नाव ठेवलं आहे. ज्याचा अर्थ खूप खोल आहे.

2/5
राम चरण म्हणाला,
राम चरण म्हणाला, "आमच्या मुलांचं नाव ठेवणं हा आमच्या दोघांसाठी खूप वैयक्तिक आणि आध्यात्मिक निर्णय होता. मी आणि माझी पत्नी उपासना यांनी यावर सविस्तर चर्चा केली, पण आमच्या पालकांनीही या निर्णयात महत्त्वाची भूमिका बजावली. आपल्या संस्कृतीत वडीलधाऱ्यांना आदराने पाहिलं जातं. म्हणूनच या प्रक्रियेत आपली उपस्थिती महत्त्वाची आहे"
advertisement
3/5
रामचरणने मुलाचं नाव शिवराम ठेवलं आहे. त्याने सांगितलं की, शिव हे नाव भगवान शिव आणि भगवान राम या दोन शाश्वत आदर्शांचं प्रतिनिधित्व करतं. जे संयमासह शक्ती, धार्मिकतेसह भक्तीचं प्रतीक आहेत. तसंच त्याने सांगितलं की,
रामचरणने मुलाचं नाव शिवराम ठेवलं आहे. त्याने सांगितलं की, शिव हे नाव भगवान शिव आणि भगवान राम या दोन शाश्वत आदर्शांचं प्रतिनिधित्व करतं. जे संयमासह शक्ती, धार्मिकतेसह भक्तीचं प्रतीक आहेत. तसंच त्याने सांगितलं की,"हे नाव माझ्या वडिलांचं जन्मनाव शिव शंकर वार प्रसाद याचंदेखील प्रतिनिधित्व करतं. त्यामुळे ते वंश आणि कृतज्ञतेची भावना देखील दर्शवतं"
advertisement
4/5
रामचरणने मुलीचं नाव अन्वीरा देवी ठेवलं आहे. ती अमर्याद धैर्य आणि दैवी स्त्री शक्तीचे प्रतीक आहे. वीरा शौर्याशी संबंधित आहे आणि अन ती अमर्यादपणे वाढवते. शक्ती आणि कृपा एकत्र राहतात याची आठवण करून देण्यासाठी देवी हे जाणूनबुजून जोडलं गेलं, असं त्याने सांगितलं.

5/5
रामचरण म्हणाला,
रामचरण म्हणाला, "आमच्यासाठी ही नावं केवळ ओळख नाहीत तर शक्ती, प्रेम आणि धैर्याचं प्रतीक आहेत"
advertisement
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement