हात नाही, चमचा नाही, मग कसा खायचा भात? सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा VIDEO

Last Updated:

How to eat rice : काही लोक चमच्याने भात खातात तर काही हाताने. पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत ना हात, ना चमच्याने भात खाणं दाखवलं आहे. तर भात खाण्याची वेगळीच पद्धत दाखवली आहे.

News18
News18
नवी दिल्ली : भात हा भारतीय आहारातील प्रमुख पदार्थ. भारतीयांसाठी एक मुख्य अन्न आहे. सामान्यपणे हात आपण हाताने खातो किंवा चमच्याने. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात भात कसा खायचा, याची पद्धत दाखवली आहे. व्हिडीओत दाखवल्यानुसार भात हातानेही खायचा नाही आणि चमच्यानेही नाही. मग आता भात कसा खायचा असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
भारतात काही लोक चमच्याने भात खातात तर काही हाताने. शक्यतो हाताने भात खावा असं  सांगितलं जातं. पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत ना हात, ना चमच्याने भात खाणं दाखवलं आहे. तर भात खाण्याची वेगळीच पद्धत दाखवली आहे. माहितीनुसार भात खाण्याची ही ब्रिटिश पद्धत आहे. एका ब्रिटिश शिष्टाचार तज्ज्ञाने भात खाण्याची ही ब्रिटिश पद्धत दाखवली आहे. विल्यम हॅन्सन असं त्याचं नाव.
advertisement
व्हिडीओमध्ये हॅन्सन सांगतो की, "ब्रिटीश जेवणाच्या शिष्टाचारात आपण भात वाटाण्यासारखा खातो. नाइफ वापरताना आपण कधीही फोर्क उलटा करत नाही. आपण भात काट्याच्या मागच्या बाजूला ढकलतो आणि तो तसाच खातो." त्यानंतर तो एक प्रात्यक्षिक देतो. फोर्क वर करा, नाइफने भात गोळा करा, थोडासा भात नाइफच्या मदतीने फोर्कच्या मागच्या बाजूवर घ्या आणि तसाच तोंडात घाला.
advertisement
ब्रिटिश शिष्टाचारानुसार काटा नेहमीच डाव्या हातात वर असतो. आपण नाइफने अन्न ढकलतो आणि काट्यावर घेतो. भातासारख्या मऊ पदार्थांसाठी हे शोभिवंत मानलं जातं. हॅन्सनच्या 'एलिमेंट्स ऑफ एटिकेट' या पुस्तकातही याचा उल्लेख आहे. पण आशियाई संस्कृतींमध्ये हे विचित्र वाटतं.
भात खाण्याच्या पद्धतीच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. यावर बहुतेक एका युझरने "काही देशांमध्ये आपण काट्याने भात चमच्यावर ढकलतो, पण हे पुढील पातळीचं आहे", असं म्हटलं. दुसऱ्याने लिहिलं की, "काट्यावर भात ठेवणं म्हणजे एव्हरेस्ट चढण्यासारखं आहे." तिसऱ्याने म्हटलं "हे भाताला मारण्यासारखं आहे. चौथ्याने "अतिरेक! चमचा वापरा." असं म्हटलं. तर एकाने आपण भारतात आपल्या हातांनी खातो, त्याची चव वेगळी आहे", असं सांगितलं.
advertisement
हाताने जेवण करण्याचे फायदे
भारतीय परंपरेत अन्न नेहमी जमिनीवर बसून आणि हाताने खाल्लं जातं. ते तुमच्यासाठी फायदेशीर आहे. आयुर्वेद आणि विज्ञानही असं मानतं.
आयुर्वेदानुसार हाताने खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं. ते पाच ज्ञानेंद्रिये आणि पचनासाठी देखील चांगलं आहे. आपली पाच बोटं पाच वेगवेगळ्या घटकांचं प्रतिनिधित्व करतात. अशा परिस्थितीत जेव्हा आपण आपल्या हाताने जेवतो तेव्हा आपण ते घटक सक्रिय करतो, जे शरीराची ऊर्जा टिकवून ठेवतात. तसंच जेव्हा आपण आपल्या हातांनी खातो तेव्हा आपण आपल्या बोटांनी अन्नाला स्पर्श करतो, ज्यामुळे मेंदूला संदेश जातो की आपण खाण्यासाठी तयार आहोत, ज्यामुळे पचनक्रिया सक्रिय होते आणि आरोग्य सुधारतं.
advertisement
विज्ञानानुसार हाताने अन्न खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. कारण हातांमध्ये काही जीवाणू आढळतात, जे हानिकारक नसले तरी वातावरणातील विविध हानिकारक जंतूंपासून शरीराचं संरक्षण करतात. पण जेवण्यापूर्वी हात चांगले स्वच्छ करावेत, जेणेकरून घातक रोग टाळता येतील. हाताने खाल्ल्याने आपण काय खातो, किती खातो, हाताने अन्न खाल्ल्याने किती झपाट्याने खातो कळतं. हे पचनाच्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं.
मराठी बातम्या/Viral/
हात नाही, चमचा नाही, मग कसा खायचा भात? सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा VIDEO
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement