Weird Fish : मासे खायच्या तयारीत होती महिला, शिजवताना घाबरली, दिसलं असं काही, भीतीनं जेवलीही नाही
- Published by:Priya Lad
Last Updated:
Human teeth fish : तिनं मासे खरेदी केले. घरी आल्यावर तिनं मासे शिजवण्याची तयारी सुरू केली. तिनं मासे स्वच्छ करायला घेतले. यावेळी जसं तिनं माशाचं तोंड उघडलं, तसा तिला धक्काच बसला. तिनं याचा व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला आहे.
नवी दिल्ली : मासे म्हणताच कित्येकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. काही लोकांना एका विशिष्ट वाराला मासे लागतात. तर काही लोकांचं जेवण माशाशिवाय घशाखाली उतरतच नाही. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. अशीच एक फिश लव्हर जी मासे घरी घेऊन गेली. पण तिनं जसे मासे शिजवायला घेतले तसा तिला घामच फुटला. यानंतर खाण्याची हिंमतच तिची झाली नाही.
ब्राझीलमधीलही महिला. पॉला असं तिचं नाव. ब्राझीलमधीलच एका समुद्रकिनाऱ्यावर ती फिरायला गेली होती. तिथं तिला मासे दिसले. रात्रीच्या जेवणात मासे बनवूया असं तिनं ठरवलं. म्हणून तिनं मासे खरेदी केले. घरी आल्यावर तिनं मासे शिजवण्याची तयारी सुरू केली. तिनं मासे स्वच्छ करायला घेतले. यावेळी जसं तिनं माशाचं तोंड उघडलं, तसा तिला धक्काच बसला. तिनं याचा व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला आहे.
advertisement
माशात असं काय दिसलं?
आता माशाच्या तोंडात असं काय होतं? हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. या माशाचा जबडा चक्क माणसासारखा होता. त्याच्या तोंडात माणसासारखे दात होते. तरी पॉलाच्या कुटुंबाने तो मासा फ्राय केला आणि खाल्लासुद्धा. मासा खाल्ल्यानंतर घरच्यांनी तो सामान्य माशाइतकाच चविष्ट असल्याचं सांगितलं. पण पॉलामध्ये ते खाण्याची हिंमत नव्हती. मासा सोडा पॉलाला मात्र जेवणही गेलं नाही. तिनं काहीच खाल्लं नाही.
advertisement
पॉला म्हणाली, हे पाहिल्यानंतर मला इतकं विचित्र आणि भीतीदायक वाटलं की मी रात्रीचे जेवणदेखील केलं नाही.

फोटो : Instagram/Paula Moreira
सागरी जीवशास्त्रज्ञ जोआओ गॅस्परानी यांच्या मते, या माशांना हे दात आहेत कारण ते शेलफिशला त्यांचा शिकार बनवतात. या माशांचं वजन 35 पाऊंडपर्यंत असतं, हे मासे 35 इंच पर्यंत वाढू शकतात.
advertisement
याआधीही सापडला होता असा मासा
याआधी फिलिपाइन्समधील महिलेलाही असा मासा सापडला होता. मारिया क्रिस्टीना कुसी नावाची ही महिला, तिनं बाजारातून अनेक प्रकारचे मासे विकत घेतले होते. त्यापैकी एका माशाला माणसासारखे दात होते. ती घाबरली. सुरुवातीलाहे दात माणसाचे असतील, असं तिला वाटलं. पण जेव्हा तिने तपासले तेव्हा ते दात माशाच्या तोंडाला चिकटलेले होते, म्हणजेच ते त्याचे दात होते. मारियानेनंतर तो मासा फेकून दिला.
advertisement
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, त्या माशाची किंमत 4 डॉलर म्हणजे सुमारे 320 रुपये होती. त्या माशाचं नाव बिगहेड कार्प, ज्याला इमेल्डा असंही म्हणतात. पूर्व आशियातील लोकांना हा गोड्या पाण्यातील मासा खायला आवडतो.
view commentsLocation :
Delhi
First Published :
Jan 14, 2025 2:56 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Weird Fish : मासे खायच्या तयारीत होती महिला, शिजवताना घाबरली, दिसलं असं काही, भीतीनं जेवलीही नाही







