Jyoti Malhotra : "माझं लग्न पाकिस्तानात लावून द्या", गद्दार ज्योतीचं एजंटसोबतचं चॅट समोर
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पाकिस्तानात एजंटने ज्योतीची चांगलीच बडदास्त ठेवली होती. तिथून परतल्यानंतर ती सातत्यानं अली हसनशी चॅट करत होती.
नवी दिल्ली: एखाद्या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटाच्या कहाणीसारखंच युट्यूबर ज्योती मल्होत्रा हेरगिरी प्रकरणात दररोज नवनवीन ट्विस्ट अँड टर्न्स येत आहे. ज्योतीचं पाकिस्तानी एजंट अली हसन सोबतचं चॅट समोर आलं. कबुलनाम्यातचं तिनं म्हंटलंय की सोशल मीडिया अॅप्सच्या माध्यमातून ती पाकिस्तानी अधिकारी आणि एजंटशी कायम संपर्कात होती.. तिच्या सोशल मीडिया अकाऊंट्सच्या चाचणीदरम्यान तपास यंत्रणांना ज्योती आणि पाक एजंट अली हसनचं संभाषण सापडलंय. त्यामध्ये तिने माझे लग्न पाकिस्तानात लावून द्या, असे म्हटले आहे.
पाक दूतावासातील दानिशच्या सांगण्यावरून पाकिस्तानमध्ये ज्योती याच अली हसनला भेटली. पाकिस्तानात त्याने ज्योतीची चांगलीच बडदास्त ठेवली होती. तिथून परतल्यानंतर ती सातत्यानं अली हसनशी चॅट करत होती.
समोर आलेल्या चॅटमध्ये नेमकं काय आहे?
ट्रॅव्हल व्लॉगिंगच्या आडून हेरगिरी केल्याचा आरोप असलेल्या यूट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली. तिच्या मोबाईलमध्ये महत्त्वाचे चॅट सापडले आहेत. ज्योती मल्होत्रा आणि आयएसआय एजंट अली हसन यांच्यातील हे चॅट असल्याचं सांगण्यात येतं आहे. या चॅटमध्ये अली हसन ज्योतीला म्हणतो, मी तुझ्यासाठी मनापासून दुवा करतो. तू नेहमी आनंदी राहा. तू नेहमी हसत-खेळत राहा. अशा शब्दात त्याने ज्योती बाबत आपल्या मनातील गोष्टी व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर त्याला ज्योतीने दिलेला रिप्लाय ही तितकाच बोलका आहे. तिच्या चौकशीत आता हे चॅटही उघड झालं आहे.
advertisement
नेमकं लग्नाविषयी काय म्हणाली?
एजंट : माझे हृदय नेहमीच तू आनंदी राहावी अशी प्रार्थना करते. तू नेहमी आनंदी आणि हसत खेळत राहा, तुझ्या आयुष्यात कधीही दुःख येऊ नये..
ज्योती - माझे लग्न पाकिस्तानात लावून द्या
ज्योती 'जासूस'चा कबुलीनामा
- यूट्यूब लाईक्स, सबस्क्राईबच्या नादात पाकच्या जाळ्यात
- देश-विदेश दौऱ्यासाठी पाककडून फंडिंग
- पैसे कमवण्याचा सोपा मार्ग स्वीकारला
- पाक अधिकारी दानिशच्या संपर्कात
- पाक व्हिजाच्या निमित्तानं ओळख
- दानिशचा खासगी मोबाईल नंबर मिळवला
- दानिशच्या सांगण्यावरूनच पाक दौरा
- दानिशच्या सांगण्यावरूनच पाक अधिकाऱ्यांशी संपर्क
- दोनवेळा पाकिस्तान दौरा
- अली हसननं पाकिस्तानमध्ये ठेवली बडदास्त
- पाकमध्ये शाकीर, राणा शाहबाजशी ओळख
- संशय येऊ नये म्हणून शाकीरचा नंबर 'जट रंधावा' नावानं सेव्ह
- व्हॉट्सअॅप, स्नॅपचॅट, टेलिग्रामवरून पाक एजंटशी संपर्कात
- सोशल मीडियावरून माहिती पुरवली
advertisement
Location :
Delhi
First Published :
May 21, 2025 7:24 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Jyoti Malhotra : "माझं लग्न पाकिस्तानात लावून द्या", गद्दार ज्योतीचं एजंटसोबतचं चॅट समोर


