ना मेकअप, ना दागिन्यांचा साज, ना डिझाइनर कपडे! पण सौंदर्य असं की हिच्यासमोर मॉडेलही फेल

Last Updated:

No Makeup Look Woman Photo Viral : साधेपणात सौैंदर्य म्हणतात ना, अशीच नॅच्युरल ब्युटी असलेली ही महिला. जिच्या सौंदर्याने सगळ्यांना भुरळ घातली आहे. भल्या भल्या मॉडेल्स, अभिनेत्रींनाही मागे टाकेल असे या महिलेचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

News18
News18
नवी दिल्ली : सुंदर दिसण्यासाठी कितीतरी महिला मेकअप करतात, दागिने घालतात, महागडे कपडे घालतात. असं सुंदर तर कुणीही दिसतंच. पण मेकअप, दागिन्यांशिवाय सुंदर दिसणं म्हणजेच खरं सौंदर्य. साधेपणात सौैंदर्य म्हणतात ना, अशीच नॅच्युरल ब्युटी असलेली ही महिला. जिच्या सौंदर्याने सगळ्यांना भुरळ घातली आहे. भल्या भल्या मॉडेल्स, अभिनेत्रींनाही मागे टाकेल असे या महिलेचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
एका परदेशी फोटोग्राफर भारतीय महिलेचा काढलेला हा फोटो. एका परदेशी फोटोग्राफरने राजस्थानीतील महिलेचा इतका सुंदर फोटो काढला आहे की पाहणाऱ्या प्रत्येकाचे डोळे चमकले आहेत. या फोटोग्राफीचा व्हिडीओही व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये फोटोग्राफर वाळवंटात काळ्या कपड्याच्या बॅकग्राऊंडवर एका महिलेचा फोटो काढतो. त्या महिलेने कोणताही मेकअप केलेला नाही, कोणतेही दागिने घातले नाहीत किंवा कोणतेही स्टायलिश कपडे घातलेले नाहीत. तिने साधी कुर्ती आणि घागरा घातली आहे आणि तिच्या डोक्यावर स्टोल आहे.
advertisement
राजस्थानतील तीव्र सूर्यप्रकाश, कडक ऊन आणि वाळवंटातील वारं यामुळे तेथील लोकांची त्वचा अनेकदा गडद रंगाची होते. सूर्यप्रकाशामुळे त्वचा जळते, ज्यामुळे रंग काळवंडतो. पण जर त्यांचे डोळे, चेहरा आणि भाव पाहिले तर त्यांचं सौंदर्य कोणत्याही मॉडेलशी स्पर्धा करू शकतं. असंच या महिलेचं सौंदर्य आहे.
advertisement
तिचे खोल डोळे हे फोटोतील सर्वात खास वैशिष्ट्य आहे, ज्यांचं एक वेगळेच आकर्षण आहे. मेकअपशिवाय आणि साध्या कपड्यांमध्येही, महिलेच्या खोल डोळ्यांनी आणि साधेपणाने लोकांची मनं जिंकली.  या महिलेचा लूक इतका प्रभावी आहे की पाहणाऱ्याच्या नजरा तिच्यावरून हलत नाही. तिचा लूक इतका मनमोहक आहे की पाहणाऱ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या आहेत.
advertisement
अहमद अल हंजौल यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंट @ahmed.hanjoul.photography वर असे अनेक भारतीय चेहरे शेअर केले आहेत.  यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने म्हटलं, कॅमेऱ्याने साधेपणात लपलेलं सौंदर्य ज्या पद्धतीने टिपलं आहे, ते अद्भुत आहे. दुसऱ्या युझरने म्हटलं, "वाळवंटातील रणरणत्या उन्हात या चेहऱ्याने थंड वाऱ्यासारखा आराम दिला."
advertisement
तुम्हाला या महिलेचे फोटो, तिचं सौंदर्य कसं वाटलं, यावर तुमची काय कमेंट आहे. या महिलेच्या फोटोला तुम्ही काय कॅप्शन द्याल. आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
view comments
मराठी बातम्या/Viral/
ना मेकअप, ना दागिन्यांचा साज, ना डिझाइनर कपडे! पण सौंदर्य असं की हिच्यासमोर मॉडेलही फेल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement