Kitchen Jugaad Video : लिंबू-मिरचीसारखी दरवाजावर लटकवा पाण्याने भरलेली पिशवी; मोठा त्रास दूर होईल

Last Updated:

प्लॅस्टिक पिशवीचा असा अनोखा वापर, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.

News18
News18
नवी दिल्ली :  तुमच्या घरात ट्रान्सपरंट प्लॅस्टिक पिशवी असेलच. सामान्यपणे या पिशवीचा वापर तुम्ही कचऱ्यासाठी करत असाल. पण या पिशवीचा असा एक वापर ज्यामुळे तुमची सर्वात मोठी समस्या दूर होईल. प्लॅस्टिक पिशवीत पाणी भरून ही पिशवी तुम्ही दरवाजाला लटकवा. याचा तुम्हाला मोठा फायदा आहे. आता तो कोणता ते पाहुयात. सोशल मीडियावर बरेच टीप्स, जुगाडाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशाच व्हिडीओपैकी हा एक व्हिडीओ आहे. ज्यात प्लॅस्टिक पिशवीचा असा वापर दाखवण्यात आला आहे. प्लॅस्टिक पिशवीत तुम्हाला पाणी तर घ्यायचं आहेच. पण यासाठी तुम्हाला सिल्व्हर किंवा अॅल्युमिनिअम फॉईलची गरज पडेल. ज्यात आपण सामान्यपणे डब्यासाठी चपाती गुंडाळून देतो.
आता तुम्हाला करायचं काय आहे तर एका मोठ्या सिल्व्हर फॉईलचे दोन भाग करायचे आहेत. हलक्या हाताने त्याचे गोळे करून घ्यायचे. यानंतर एक ट्रान्सपरंट प्लॅस्टिकची पिशवी घ्या. त्यात पाणी भरा आणि सिल्वहर फॉईलचे तयार केलेले गोळे त्या पिशवीतील पाण्यात टाका. या पिशवीला गाठ मारा. ही पिशवी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला लटकवा. याशिवाय तुम्ही गेट, किचनमध्ये लटकवू शकता. आता याचा फायदा काय? तर तुम्ही नीट पाहिलं तर या पिशवीतील पाण्यात टाकलेले सिल्वहर फॉईलचे गोळे चमकताना दिसत आहेत. असं काही पाहिल्यानंतर माश्या त्याच्या जवळ येत नाही. काहीतरी धोका मानून त्या तिथून दूर पळतात. जेव्हा तुम्ही अशी पिशवी एखाद्या ठिकाणी लटवकता तेव्हा तिथं माश्या फिरकतही नाही. यामुळे घरात किंवा तुमच्या घराच्या परिसरात येणाऱ्या माश्यांचा त्रास संपेल.
advertisement
Vardan Pakwan युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा उपाय माश्यांचा दूर पळवण्याचा सोपा उपाय आहे, असा दावा या व्हिडीओत करण्यात आला आहे.
हा उपाय प्रभावी ठरेलच याची शाश्वती न्यूज 18 लोकमत देत नाही. त्यामुळे तुम्ही हा उपाय करून पाहा आणि खरंच या व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे तुम्हाला त्याचा परिणाम दिसून आला का, हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : लिंबू-मिरचीसारखी दरवाजावर लटकवा पाण्याने भरलेली पिशवी; मोठा त्रास दूर होईल
Next Article
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement