Jugaad Video - सकाळी उठल्या उठल्या झाडूला लावा टुथपेस्ट; पैशांची बचत होईल

Last Updated:

झाडूला टुथपेस्ट लावण्याचा मोठा फायदा आहे. एका गृहिणीने हा किचन जुगाड दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

किचन जुगाड (फोटो - युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
किचन जुगाड (फोटो - युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
नवी दिल्ली : सकाळी उठल्या उठल्या आपण सर्वात आधी कोणतं काम करतो तर ब्रश करतो. टुथपेस्ट लावून दात घासतो, तोंड स्वच्छ करतो. पण तुम्ही दातांना लावत असलेली टुथपेस्ट झाडूला लावून पाहिली आहे का? एका गृहिणीने हा किचन जुगाड दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
तसं दात घासण्याशिवाय टुथपेस्टचे आणखीही काही वापर आहेत. काही जण टुथपेस्टने चांदीचे दागिने, भांडीही स्वच्छ करतात. पण टुथपेस्टचा असा अनोखा वापर तुम्ही पाहिला नसेल. झाडूसाठीही टुथपेस्ट फायद्याची आहे. झाडूवर टुथपेस्ट लावताच तुमच्या पैशांचीही बचत होईल. आता ते कसं, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. चला तर मग पाहुयात नेमकं करायचं काय?
advertisement
आता इथं तुम्हाला टुथपेस्ट म्हणजे टुथपेस्ट नाही तर टुथपेस्ट ट्युबचा वापर करायचा आहे. सामान्यपणे टुथपेस्ट संपली की आपण ट्युब फेकून देतो. पण त्याचा तुम्ही असा वापर करू शकता. तुम्हाला करायचं काय आहे तर टुथपेस्टच्या खालच्या टोकाला एक छिद्र पाडायचं आहे. टुथपेस्टचा पुढचा भाग या छिद्रात जाईल इतका हा छिद्र मोठा असावा. आता ही ट्युब झाडूच्या दांड्यापासून थोड्या खाली अंतरावर गुंडाला. ट्युबच्या खालच्या भागात पाडलेल्या छिद्रात ट्युचा वरचा भाग घुसवा आणि झाकण लावून घ्या.
advertisement
याचा फायदा काय तर तुम्ही पाहिलं असेल झाडू जेव्हा तुम्ही बेड, कपाट, फ्रिजखाली घालता तेव्हा ती विस्कटली जाते, तुटते आणि लवकर खराब होते. मग नवीन झाडू घ्यावी लागते, त्यासाठी पैसे खर्च होतात. पण झाडूवर टुथपेस्ट ट्युब लावल्याने झाडू फार फुलणार, अडकणार नाही. छोट्या जागेतही ती सहज जाईल आणि बराच वेळ वापरता येईल. नवीन झाडू लवकर घेण्याची गरज पडणार नाही. साहजिकच पैशांची बचत होईल.
advertisement
@mairaamazingrecipes युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम कसा वाटला, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
(सूचना - या लेखातील माहिती सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
Jugaad Video - सकाळी उठल्या उठल्या झाडूला लावा टुथपेस्ट; पैशांची बचत होईल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement