advertisement

मुलींचे फोटो अन् काळ्या बाहुल्या! तरुणींना वश करण्यासाठी Black Magic, पुरोगामी कोल्हापुरात हे काय सुरूये?

Last Updated:

Kolhapur Black Magic: कोल्हापुरात एकतर्फी प्रेमातून प्रेमवीरांनी कहरच केला आहे. एका बाभळीच्या झाडावर मुलींचे फोटो आणि काळ्या बाहुल्या लटकावल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय.

Kolhapur Black Magic: कोल्हापूरच्या प्रेमवीराचं अघोरी कृत्य, बाभळीच्या झाडाला लटकावले तरुणींचे फोटो!
Kolhapur Black Magic: कोल्हापूरच्या प्रेमवीराचं अघोरी कृत्य, बाभळीच्या झाडाला लटकावले तरुणींचे फोटो!
कोल्हापूर: एखादी व्यक्ती आपल्याला आवडत असेल तर तिला खूश करण्यासाठी आणि तिचं लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जातात. अगदी महागड्या गिफ्ट आणि आवडत्या वस्तू देखील गिफ्ट म्हणून दिल्या जातात. परंतु, कोल्हापूरच्या प्रेमवीरानं कहरच केला असून तरुणींना वश करण्यासाठी अघोरी कृत्य केलंय. या घटनेनं भुदरगड तालुक्यातील आकुर्डी महालवाडी परिसरात खळबळ उडालीये.
अंधश्रद्धा निर्मुलनासाठी कायदा झाला तरी अद्यापही करणी, भानामतीचे प्रकार काही ठिकाणी उघडकीस येतात. आकुर्डी महालवाडी गावातील कुराण नावाच्या शेतात गवताचा माळ आहे. या माळावर असणाऱ्या बाभळीच्या झाडावर तरुणींना वश करण्यासाठी दाभणाने मुलींचे फोटो लटकावले आहेत. तसेच लिंबू आणि काळ्या बाहुल्यांचा ही या प्रकारात वापर करण्यात आला आहे.
advertisement
नुकतेच महालवाडी येथील ग्रामदेवतेच्या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्ताने गावामध्ये विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. इथे असणाऱ्या कुराण माळावर काही ग्रामस्थ ग्राउंड तयार करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना हा आघोरी प्रकार निदर्शनाला आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या या घटनेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय.
advertisement
नेमकं काय घडलं होतं ?
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात असणाऱ्या आकुर्डी महालवाडी जवळच कुरण नावाचा माळ आहे. या संपूर्ण दहा एकराच्या माळावर केवळ एकच बाभळीचं झाड आहे. या झाडावर तीन मुलींच्या फोटोवर लिंबू दाबडाने टोचलेले आढळले. तसेच झाडावर बाहुल्याही अडकवण्यात आल्या होत्या. एका बाहुलीवर तरुणीचा फोटो होता. तर दुसऱ्या युवतीच्या आई-वडील आणि आजीचे फोटो या झाडाच्या फांद्यावर लटकवलेले होते. हा अघोरी प्रकार अमावस्येच्या मध्यरात्री घडला असल्याचं बोललं जातंय. तसेच या बाहुल्यांबरोबरच तरुणींचे फोटोही झाडाला बांधले होते आणि त्यासोबत दाबणांमध्ये युतीच्या ड्रेसची बटणे देखील काळ्या दोऱ्यामध्ये अडकवलेली आहेत.
advertisement
दरम्यान, अंधश्रद्धा निर्मुलनासाठी कायदा झाला तरी अद्यापही करणी, भानामतीचे प्रकार काही ठिकाणी उघडकीस येतात. एकतर्फी प्रेमातून मुलींना वश करण्यासाठी हा अघोरी प्रकार केल्याचे सांगितले जातेय.
view comments
मराठी बातम्या/Viral/
मुलींचे फोटो अन् काळ्या बाहुल्या! तरुणींना वश करण्यासाठी Black Magic, पुरोगामी कोल्हापुरात हे काय सुरूये?
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement