advertisement

प्लास्टिकच्या खुर्च्या झाल्यात काळ्या-मळलेल्या? मग 'या' ट्रिक्सने करा झटपट नवीन

Last Updated:

खुर्च्या काळवंडल्या असतील, खराब झाल्या असतील तर काळजी करु नका या ट्रीक्स वापरुन करा नव्या सारख्या.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : प्लास्टिकच्या अनेक वस्तू आपण खरेदी करतो. अगदी घरातल्या चमच्यांपासून टेबल, खुर्चीपर्यंत. टेबल आणि खुर्च्या कालांतराने वापरून खराब दिसतात. झिजलेल्या जागांवरचा रंग उडतो, त्या काळवंडतात. अशा खुर्च्या नव्यासारख्या करण्यासाठी काही खास टिप्स जाणून घेऊ या.
घर किंवा कार्यालयांमध्ये प्लास्टिकच्या खुर्च्या वापरात असलेल्या दिसतात. घरातलं इतर फर्निचर बराच काळ वापरल्यावर जुनाट दिसू लागतं तसंच प्लास्टिकच्या वस्तूंचंही होतं. प्लास्टिकच्या खुर्च्या दीर्घ काळ वापरल्यानंतर खराब दिसू लागतात. रंग उडाल्यामुळं त्या दिवाणखान्यात वापरताही येत नाहीत. खुर्च्या वापरण्यायोग्य असल्या तरी त्या घरात शोभून दिसत नसल्यामुळं एक तर त्या अडगळीच्या खोलीत जातात किंवा त्यांचा वरचेवर वापर बंद होतो आणि मग नकळत घरात नव्यानं खुर्च्यांची खरेदी केली जाते. अशा प्रकारे अडगळीत जाऊ शकणाऱ्या खुर्च्या आपण अगदी सहज नव्यासारख्या करू शकतो.
advertisement
स्वच्छता
बरीच वर्षं वापर केल्यानंतर खुर्चीचा काही ठिकाणचा रंग उडालेला दिसतो आणि काही ठिकाणी ती रंगीत दिसते. खुर्ची नव्यासारखी दिसण्यासाठी खुर्ची स्क्रबने स्वच्छ करता येईल. कोमट पाणी करून त्यात बेकिंग सोडा, व्हिनेगार एकत्र करून मिश्रण तयार करावं आणि स्क्रबने घासताना हे मिश्रण वापरावं. खुर्च्या अगदी स्वच्छ होतात.
आवडत्या रंगानं रंगवा खुर्ची
Do It Yourself द्वारे आपल्या आवडत्या प्लास्टिक पेंटने खुर्ची पुन्हा एकदा रंगवून नव्यासारखी करता येईल. त्यावर एखादं चित्रंही काढू शकता. त्यामुळं खुर्ची नव्यासारखी करता येईल.
advertisement
स्टीकर्सचा वापर
अलीकडे घराच्या भिंती, फर्निचर यांच्या सजावटीसाठी स्टीकर्सचा वापर सहजपणे केला जातो. जास्त कष्ट न करता आपलं घर आकर्षकरीत्या सजवण्यासाठी बाजारात स्टीकर्सचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. हे स्टीकर वापरण्यापूर्वी खुर्चीवरचा जुना रंग पूर्णपणे काढून खुर्ची स्वच्छ करावी लागेल.
नवीन लूक
खुर्चीवर असणारं डिझाइन वर्षानुवर्षं बघूनही आपल्याला कंटाळा येतो. ते बदलून आपल्याला खुर्ची रिक्रिएट करता येते. त्यासाठी खुर्चीवरचा रंग स्क्रबने काढून एकाच रंगात रंगवून घ्यावी. त्यानंतर एखादी जुनी चौकोनी उशी खुर्चीवर ग्लूच्या साह्यानं चिकटवावी.
advertisement
खुर्ची झाकण्याचाही आहे उपाय
कमी वेळात खुर्ची स्वच्छ दिसावी, असं वाटत असेल तर घरच्या घरीच खुर्चीवर घालता येईल, असं कापडी कव्हर तुम्ही तयार करून ते खुर्चीवर घालू शकता.
view comments
मराठी बातम्या/Viral/
प्लास्टिकच्या खुर्च्या झाल्यात काळ्या-मळलेल्या? मग 'या' ट्रिक्सने करा झटपट नवीन
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement