बाबो! 15 बायका, 30 मुलं आणि 100 नोकर... 'तो' विमानातून उतरला आणि एअरपोर्टवर लॉकडाऊन
- Published by:Priya Lad
Last Updated:
एका खाजगी जेटमधून उतरणारा इतका मोठा ताफा पाहिल्यानंतर विमानतळावर घबराट पसरली होती, ज्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना तीन टर्मिनल बंद करावे लागले. विमानतळावर ताबडतोब व्हर्च्युअल लॉकडाऊन लागू करण्यात आला.
नवी दिल्ली : विमानतळावरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक पुरुष आणि त्याच्यामागे बऱ्याच महिला विमानातून उतरताना दिसत आहेत. ही व्यक्ती एअरपोर्टवर येताच सगळे त्याला वाकून नमस्कार करताना दिसत आहेत. विमान म्हणजे लक्झरी प्रवास पण या विमानात अंगाला एखादा कपडा गुंडाळलेली ही व्यक्ती पण तिचा थाट पाहून सगळे आश्चर्यचकीत झाले आहेत. हा नेमका आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
यूएईच्या अबूधाबी एअरपोर्टवरील हे दृश्य आहे. एका खाजगी जेटमधून उतरणारा हा पुरुष, त्याच्यासोबत 15 पत्नी, 30 मुलं आणि जवळजवळ 100 नोकर होते. इतका मोठा ताफा पाहिल्यानंतर विमानतळावर घबराट पसरली होती, ज्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना तीन टर्मिनल बंद करावे लागले. विमानतळावर ताबडतोब व्हर्च्युअल लॉकडाऊन लागू करण्यात आला.
advertisement
हा कोणी सामान्य माणूस नाही, तर आफ्रिकेच्या शेवटच्या निरपेक्ष राजेशाहीचा राजा आहे. हा पुरूष म्हणजे इस्वातिनीचा राजा मस्वाती तिसरा.इस्वातिनी ज्याला आधी स्वाझीलंड म्हणून ओळखलं जातं, हा एक आफ्रिकन देश आहे. राजा मस्वती 1986 पासून राजा आहेत. ते जगातील सर्वात श्रीमंत सम्राटांपैकी एक आहेत. त्यांची संपत्ती 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असल्याचं म्हटलं जातं. त्यांना 15 बायका आणि 35 हून अधिक मुलं आहेत. ते दरवर्षी "रीड डान्स" समारंभात नवीन वधू निवडतात. राजा मस्वती तिसरा यांना 30 बायका आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या वडिलांना 70 पेक्षा जास्त बायका होत्या, एकूण संख्या अंदाजे 125. त्यांना 210 पेक्षा जास्त मुले आणि जवळजवळ 1000 नातवंडं आहेत.
advertisement
advertisement
10 जुलै 2025 रोजी राजा मस्वती त्यांच्या खाजगी जेटने संयुक्त अरब अमिरातीमध्ये उतरले. आर्थिक करारांवर वाटाघाटी करण्यासाठी ते यूएईला आले होते. तेव्हा अबू धाबी विमानतळावर त्यांनी असा शाही देखावा दाखवला की संपूर्ण जग आश्चर्यचकीत झालं. त्यांचे राजेशाही जीवन आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये राजा पारंपारिक बिबट्याच्या छापील वस्त्रात सजलेला दिसतो, तर त्याच्या 30 बायका रंगीबेरंगी आफ्रिकन पोशाखात आहेत. 100 नोकरांचा एक गट राजा आणि राणीच्या सामानाची हाताळणी करताना दिसला. संपूर्ण जग राजाच्या शाही जीवनशैलीने थक्क झाले आहे.
advertisement
पण त्यांच्या श्रीमंतीमुळे त्यांच्या देशाच्या गरिबीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. इस्वातिनीची 60% लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली राहते आणि राजाच्या विलासी खर्चाला देशांतर्गत विरोध वाढत आहे. पण व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला. "राजाचा ताफा संपूर्ण गावासारखा दिसतो, असं लोक म्हणत आहेत. हा व्हिडिओ जुना असला तरी तो लोकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाला आहे.
Location :
Delhi
First Published :
October 05, 2025 3:42 PM IST
मराठी बातम्या/Viral/
बाबो! 15 बायका, 30 मुलं आणि 100 नोकर... 'तो' विमानातून उतरला आणि एअरपोर्टवर लॉकडाऊन