टायर पंक्चर झालाय? मग धक्का मारण्याची गरज नाही, ‘या’ जुगाडाने गाडीमध्ये भरा हवा, पाहा VIDEO

Last Updated:

Viral Video : बाईक पंक्चर झाल्यावर होणारा त्रास टाळण्यासाठी एक अनोखा जुगाड सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण बाईकच्या...

Viral Video
Viral Video
Viral Video : बऱ्याचदा बाईक पंक्चर झाल्यास खूप त्रास होतो. अचानक रस्त्यात पंक्चर झाल्यास गाडी ढकलत गॅरेजपर्यंत न्यावी लागते. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. यात टायर इन्फ्लेटरशिवाय एका वेगळ्याच पद्धतीने बाईकच्या टायरमध्ये हवा भरलेली दिसते.
हा जुगाड महत्त्वाचा ठरतो
साधारणपणे बाईकचा टायर पंक्चर झाल्यावर आपण हवा भरण्यासाठी गॅरेजमध्ये जातो. कधीकधी टायरमधील हवा इतकी कमी होते की, गाडी ढकलत न्यावी लागते. अशावेळी, सोशल मीडियावर काही जुगाडांचे व्हिडिओ समोर येतात, जे खूप उपयोगी पडतात. हे उपाय खिशाला परवडणारे आणि कठीण काळात मदतीचे ठरतात.
चक्क सायलेंसरमधून भरली हवा
हा व्हायरल झालेला व्हिडिओमध्ये एक माणूस आपल्या पंक्चर झालेल्या बाईकच्या टायरमध्ये सायलेंसरच्या मदतीने हवा भरताना दिसत आहे. यासाठी तो एक ट्यूब वापरतो. ट्यूबचा एक भाग तो टायरमध्ये आणि दुसरा सायलेंसरमध्ये लावतो. त्यानंतर तो बाईक सुरू करतो. बाईक सुरू केल्यावर सायलेंसरमधून निघणारा धूर टायरमध्ये भरतो. अशाप्रकारे, तो पंक्चर झालेल्या टायरमध्ये हवा भरून गाडी चालवण्यायोग्य बनवतो.
advertisement
काही लोकांनी या पद्धतीवर टीका केली आहे, पण तरुणाचे म्हणणे आहे की, याचा वापर कमीत कमी गाडी पंक्चरच्या दुकानापर्यंत घेऊन जाण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे गाडी ढकलत नेण्याची गरज नाही. हा जुगाड सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो @I_Am_AmeerAbbas नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
advertisement
मराठी बातम्या/Viral/
टायर पंक्चर झालाय? मग धक्का मारण्याची गरज नाही, ‘या’ जुगाडाने गाडीमध्ये भरा हवा, पाहा VIDEO
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement