धर्मापेक्षा माणूस मोठा! मुस्लिम व्यक्तीवर हिंदू पद्धत्तीने केले अंत्यसंस्कार; दोन मुलींनी दिला अग्नी
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
खंडव्याचे प्रसिद्ध उद्योजक रोमि अब्बासी यांनी आयुष्यभर सर्व धर्मांचा सन्मान केला आणि हिंदू संस्कृतीचा अंगीकार केला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी हिंदू रीतिरिवाजांनुसार अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे...
मध्यप्रदेशातील खंडवामधून एक खूप प्रेरणादायी बातमी समोर आली आहे, ज्याने सर्व धर्मांच्या पलीकडे जाऊन माणुसकीचं एक चांगलं उदाहरण जगासमोर ठेवलं आहे. खंडवा येथील मालमत्ता व्यावसायिक (property businessman) रोमी अब्बासी, जे धर्माने मुस्लिम होते. त्यांचे अंतिम संस्कार मात्र हिंदू रितीरिवाजानुसार करण्यात आले. रोमी अब्बासी बऱ्याच दिवसांपासून आजारी होते आणि इंदूरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
रोमी अब्बासी यांनी एका हिंदू महिलेशी लग्न केले होते. यानंतर त्यांनी हिंदू धर्माच्या परंपरा आणि रितीरिवाज पूर्णपणे आपल्या जीवनाचा भाग बनवल्या होत्या. पूजा-पाठ, धार्मिक विधी आणि मंदिरांना भेट देणे हा त्यांच्या घरातील नियमित भाग होता. त्यांची जीवनशैली सर्व धर्मांचा आदर करणारी होती आणि ते आपली पत्नी आणि मुलींसोबत हिंदू रितीरिवाजांचे पालन करत होते.
advertisement
मुलींनी दिला खांदा आणि अग्नी
रोमी अब्बासी यांचे अंतिम संस्कार कुटुंबाच्या इच्छेनुसार हिंदू परंपरेनुसार करण्यात आले. विशेष गोष्ट म्हणजे त्यांच्या दोन मुलींनी त्यांना खांदा दिला आणि अग्नी देऊन अंत्यसंस्कारही केले. हा क्षण केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नाही, तर पाहणाऱ्या प्रत्येकासाठी खूप भावनिक आणि प्रेरणादायी होता. मुलींनी आपल्या वडिलांना अखेरचा निरोप दिला, हा क्षण समाजात एक मोठा संदेश देऊन गेला.
advertisement
हा समाजासाठी मोठा संदेश
रोमी अब्बासी यांच्या अंत्यसंस्कारावेळी केवळ कुटुंबच नाही, तर परिसरातील लोकांनीही या निर्णयाला पाठिंबा देताना दिसले. कोणीही यावर आक्षेप घेतला नाही आणि सर्वांनी मिळून हरिश्चंद्र मुक्ती धाममध्ये हिंदू रितीरिवाजानुसार त्यांचे अंत्यसंस्कार केले. ही घटना दर्शवते की, जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या संस्कृतीला किंवा धर्माला मनापासून स्वीकारते, तेव्हा त्याचा पूर्ण आदर व्हायला हवा.
advertisement
रोमी अब्बासी यांची कहाणी सिद्ध करते की, धर्म आणि श्रद्धेपेक्षा माणुसकी आणि प्रेम मोठे आहे. त्यांच्या जीवनातील मूल्ये आणि श्रद्धा त्यांच्या शेवटच्या क्षणांपर्यंत त्यांच्यासोबत राहिल्या आणि हा समाजासाठी एक मोठा संदेश आहे की आपण एकमेकांच्या संस्कृतीचा आणि धर्माचा आदर करायला हवा. ही घटना केवळ खंडवाच नाही, तर संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनली आहे आणि माणुसकीचं एक आदर्श उदाहरण सादर करते.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 28, 2025 11:09 AM IST
मराठी बातम्या/Viral/
धर्मापेक्षा माणूस मोठा! मुस्लिम व्यक्तीवर हिंदू पद्धत्तीने केले अंत्यसंस्कार; दोन मुलींनी दिला अग्नी