Papa Ki Pari : पापा की परीचा पाण्यात कारनामा, Video पाहून नेटिझन्स म्हणाले, 'अब करे तो क्या करे?'
- Published by:Devika Shinde
Last Updated:
सोशल मीडियावर पापा की परी संबंधीत देखील अनेक व्हिडीओ व्हायरल होताना तुम्ही पाहिलं असणार. अशा मुली जे कळत-नकळत काहीतरी चुका करतात अशा मुलींना सोशल मीडियावर पापा की परी म्हटलं जातं.
मुंबई : सोशल मीडिया हा एक असं प्लॅटफॉर्म आहे, जिथे दररोज काही ना काही व्हायरल होतच असतं. मजेशीर व्हिडिओ, फोटो, मेम्स आणि भन्नाट पोस्ट लोकांचं लक्ष वेधून घेतात. त्यामुळेच एकदा का एखादा व्यक्ती सोशल मीडियावर आला तर त्याचा तासनतास वेळ कसा निघून जातो, हे त्याचं त्यालाच कळत नाही.
सोशल मीडियावर पापा की परी संबंधीत देखील अनेक व्हिडीओ व्हायरल होताना तुम्ही पाहिलं असणार. अशा मुली जे कळत-नकळत काहीतरी चुका करतात अशा मुलींना सोशल मीडियावर पापा की परी म्हटलं जातं.
अशाच एका मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड करत आहे. या व्हिडीओत एक तरुणी पाण्यात कायाकिंग करताना असा काही प्रकार करते की पाहून नेटीझन्सना हसू आवरत नाही.
advertisement
आतापर्यंत स्कूटी चालवताना मुलींकडून अनेकदा चुका घडल्या असल्याचं तुम्ही पाहिलं असेल, पण या वेळी या तरूणीकडून पाण्यात कायाकिंग चालवताना एक चुक झाली. कायाकिंगच्या बोटीत दोन तरुणी बसल्या होत्या. तुम्हाला आजूबाजूला अनेक लोक कायाकिंग करताना दिसतील. तेव्हा दोन तरुणी पाण्यात पुढे जात असताना त्याच्या रस्त्यात एक मुलगा कायाकिंगमध्ये होता. या तरुणाला पाहून या मुलिंनी रस्ता बदलणं अपेक्षित होतं किंवा थांबणं अपेक्षित होतं. पण तरी देखील ही तरुणी कायाकिंग चालवत राहिली, ज्यामुळे ती समोरील मुलाला जाऊन धडकली.
advertisement
या धडकेमुळे या मुलाची कायाकिंग पलटली आणि तो उलटा पाण्यात पडला. नशिबाने थोड्यावेळाने कायाकिंग सरळ झाली. ज्यामुळे हा तरुण बाहेर आला. पण तो पाण्यामुळे पूर्ण ओला झाला होता.
Scooty tak to thik tha didi but ab boat se bhi 😭 pic.twitter.com/GOHCcOUCEv
— Vishal (@VishalMalvi_) April 2, 2025
advertisement
हा व्हिडीओ इथेच संपतो. पण व्हिडीओत पुढे मात्र मीम्स सुरु असतात. ज्यामध्ये एक व्यक्ती म्हणे भाई अभी करे तो क्या करे?
हा मजेशीर व्हिडिओ X वरील @VishalMalvi_ या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे – "स्कूटीपर्यंत ठीक होतं दीदी, पण आता बोटिंगमध्येही?"
व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत आणि लोकांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. तरुणीच्या अशा वागण्यामुळे नेटकरी मजेनं आता मुलींवर विश्वासच ठेऊ नये असं म्हणू लागले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 02, 2025 9:38 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Papa Ki Pari : पापा की परीचा पाण्यात कारनामा, Video पाहून नेटिझन्स म्हणाले, 'अब करे तो क्या करे?'







