Animal Knowledge - विषारी प्राण्यांवर त्यांच्या विषाचा परिणाम का होत नाही? असं त्यांच्या शरीरात असतं काय?

Last Updated:

एवढे विषारी विष असूनही ते मरत नाहीत, असं या प्राण्यांमध्ये काय असतं?

News18
News18
नवी दिल्ली, 01 डिसेंबर : किंग कोब्रा आणि ब्लू रिंग्ड ऑक्टोपस सारख्या प्राण्यांच्या शरीरात इतके विष असते की माणसाचा क्षणार्धात मृत्यू होतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की विषारी प्राण्यांना त्यांच्याच विषाचा परिणाम का होत नाही? एवढे विषारी विष असूनही ते मरत नाहीत, असे या प्राण्यांच्या शरीरात असतं काय? हाच प्रश्न Quora या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विचारण्यात आला. तुमच्याकडे योग्य उत्तर आहे का?
नॅशनल जिओग्राफीच्या अहवालानुसार, शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की त्यांच्या शरीरात असं काहीतरी आहे, ज्याचा वापर प्राणी या विषापासून बचाव करण्यासाठी करतात. अखेर तो काय आहे, याचं उत्तर एका अहवालातून मिळालं आहे. खरं तर, असे प्राणी विशेष रुपांतरित सोडियम चॅनेल विकसित करतात. शरीराचा एक भाग जो नसा, मेंदूच्या पेशी आणि स्नायूंच्या पेशींच्या योग्य कार्यासाठी आवश्यक आहे. हे विषाविरूद्ध कार्य करतं. यामुळे विषारी पदार्थ प्राण्यांच्या शरीरापासून दूर राहतात. कोब्रा चावल्यानंतरही मुंगूस जिवंत राहतात.
advertisement
नंतर शास्त्रज्ञांनी त्यावर आणखी संशोधन केलं. या प्राण्यांच्या शरीरात प्रत्यक्षात विष स्पंज किंवा प्रथिनं असल्याचं आढळून आलं, जे शरीरात पसरण्यापूर्वी हे विष शोषून घेतं. त्यामुळे त्याचा शरीरावर कोणताही परिणाम होत नाही. तथापि, सर्व विषारी प्राण्यांच्या शरीरात एकाच प्रकारचं प्रथिन असणं आवश्यक नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की प्रत्येकाच्या शरीरात काहीतरी नैसर्गिक असतं, जे या विषापासून संरक्षण करतं. सापांमध्ये विशेष रोगप्रतिकारक पेशी असतात ज्या त्यांच्या स्वतःच्या विषाशी लढू शकतात आणि ते त्यांच्या रक्तात गेल्यास त्यापासून संरक्षण करू शकतात.
advertisement
सापाचं विष रक्तप्रणालीच्या आत पोहोचल्यावरच विषारी बनतं. त्यामुळे सापांना त्यांच्या विषान मारण्यासाठी इतर प्राण्यांना चावावं लागतं. साप त्याच्या शरीराच्या एका विशिष्ट भागामध्ये विष साठवतो, ज्याला ग्रंथी म्हणतात. हे सापाच्या रक्तप्रणालीतून विष बाहेर ठेवतं आणि त्यापासून त्यांचं संरक्षण करतं. जेव्हा ते एखाद्याला चावतात तेव्हा ते त्यांच्या दातांमधून ग्रंथी बाहेर काढतात. इथून विष मानवी रक्त प्रणालीमध्ये प्रवेश करतं.
मराठी बातम्या/Viral/
Animal Knowledge - विषारी प्राण्यांवर त्यांच्या विषाचा परिणाम का होत नाही? असं त्यांच्या शरीरात असतं काय?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement