Video : घोर कलियुग! प्रेक्षकांनी थांबवलं 'राम-रावणाचं' भांडण, रामायणाच्या स्टेजवर हाय वोल्टेज ड्रामा

Last Updated:

रामायणात रामाने रावणालं मारलं होतं, पण या व्हिडीओत तर रावण रामाला मारताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
लखनऊ : सोशल मीडियावर व्हिडीओची कमी नाही इथे असंख्य व्हिडीओ दिवसेंदिवस पाहायला मिळतात. इथे बहुतांश वेळा मनोरंजक व्हिडीओ व्हायरल होतात, जे आपलं मनोरंजन करतात. तर काही व्हिडीओ हे आपल्याला अक्षरश: पोट धरुन हसायला भाग पाडतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो नवरात्रीमध्ये किंवा दसऱ्याच्या दिवसाचा असल्याचा अंदाज लावला जातोय.
हा व्हिडीओ युपीतील एका गावातील आहे. जिथे रामायणाचा खेळ रंगला आहे. उत्तर प्रदेशातील अनेक भागात अजूनही स्टेज शो किंवा नाटकं रंगतात जे पाहण्यासाठी लांबलांबवरुन माणसं जमा होतात. रामायणाचा खेळ इथे रंगतो, ज्यामध्ये काही लोक पात्र साकारतात आणि मग गाणं किंवा कहाणीच्या माध्यमातून सर्वांसमोर ऍक्टिंग करतात.
पण या व्हिडीओमध्ये खेळ फसलेला दिसत आहे. ज्यामध्ये नाटक करता करता खऱ्या आयुष्यात राम आणि रावणाचं भांडण होतं. हे भांडण नंतर इतकं वाढतं की खाली बसलेल्या प्रेक्षकांना त्यामध्ये पडून त्यांची भांडणं सोडवावी लागतात. हे दृश्य पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल.
advertisement
रामायणात रामाने रावणालं मारलं होतं, पण या व्हिडीओत तर रावण रामाला मारताना दिसत आहे.
स्टेजवर तीन लोक रामायणातील पात्रांच्या भूमीकेत दिसत आहेत. त्यांपैकी एक रावण आहे तर एक राम आणि दुसरा लक्ष्मण. या तिघांमध्ये युद्ध होते, ज्यामुळे ते स्टेजवर इकडे तिकडे फिरु लागतात. पण तेव्हाच पात्रातील रावण हा रामाला खरोखर बाण मारतो, जेव्हा राम त्याच्याजवळ ओरडायला जातो तेव्हा पुन्हा रावण त्याला मारतो. त्यानंतर रामाचं पात्र साकारलेल्या तरुण चिडतो आणि तो देखील रावणाला मारु लागतो. यानंतर कोणीही थांबायला तयार नव्हतं. आधी लोकांना हा नाटकातील एक भाग वाटला. पण नंतर हे खरंखरु भांडण असल्याचं लक्षात आल्यानंतर लोकांना त्यांना शांत करावे लागले.
advertisement
हे दृश्य खूपच मजेदार असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. लोकांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. शिवाय हा व्हिडीओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलं आहे.
गजब हाल है, किरदार निभाते समय अब धैर्य नहीं रहा, मंच पर असल में लड़ पड़े राम-रावण। अमरोहा में विजयदशमी के दिन रामलीला मंचन के दौरान श्रीराम और रावण बने कलाकारों के बीच मारपीट हो गई। जिससे वहां हंगामा खड़ा हो गया, इसके बाद रामलीला का मंचन रोक दिया गया, वीडियो Viral हो रहा #Amroha pic.twitter.com/sohWIIlHE4
advertisement
— Arun (आज़ाद) Chahal
मराठी बातम्या/Viral/
Video : घोर कलियुग! प्रेक्षकांनी थांबवलं 'राम-रावणाचं' भांडण, रामायणाच्या स्टेजवर हाय वोल्टेज ड्रामा
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement