Ratan Tata Dog Goa : रतन टाटांच्या निधनानंतर लाडका श्वान गोवाचाही मृत्यू?

Last Updated:

व्हॉट्सॲपवर व्हायरल होत असलेल्या एका मेसेजमध्ये हा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी या मेसेजचं सत्य सांगितलं आहे.

News18
News18
मुंबई : रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी त्यांचा पाळीव कुत्रा गोवाचाही मृत्यू झाला. व्हॉट्सॲपवर व्हायरल होत असलेल्या एका मेसेजमध्ये हा दावा करण्यात आला आहे. या मेसेजमध्ये लिहिलं आहे, 'दुःखद बातमी. टाटांच्या मृत्यूच्या 3 दिवसांनंतर त्यांचा पाळीव कुत्रा गोवाचाही मृत्यू. म्हणूनच असं म्हटलं जातं की कुत्रे माणसांपेक्षा अधिक निष्ठावान असतात.'
रतन टाटा एकदा गोव्याला गेले होते. तेवढ्यात एक भटका कुत्रा त्यांच्या जवळ येऊ लागला. यानंतर ते त्याला आपल्यासोबत मुंबईत घेऊन आले. टाटांनी त्याचं नाव 'गोवा' ठेवलं. यानंतर तो मुंबईतील टाटाचं कॉर्पोरेट मुख्यालय असलेल्या बॉम्बे हाऊसमध्ये राहू लागला.
हा भटका कुत्रा टाटा समूहाचे दिवंगत अध्यक्ष  रतन टाटा यांचा लाडका साथीदार बनला. त्यांच्यासोबत तो मीटिंग मध्येही असायचा. टाटांच्या अंत्यसंस्कारालाही गोवा उपस्थित होता.
advertisement
व्हायरल मेसेजचं सत्य काय?
मात्र, मुंबई पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये व्हॉट्सॲपवर व्हायरल होणारा हा मेसेज खोटा असून रतन टाटा यांचा गोवा कुत्रा जिवंत आणि निरोगी असल्याची पुष्टी केली आहे. इन्स्पेक्टर कुडाळकर यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये या अफवांचं खंडन केलं आहे.
कुडाळकर यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'मी टाटाजींचे जवळचे मित्र शंतनू नायडू यांच्याशी याची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितलं की गोवा पूर्णपणे ठीक आहे.' त्यांनी शंतनू नायडूंसोबत त्यांच्या संदेशांचे स्क्रीनशॉट देखील शेअर केले, ज्यामध्ये गोवाबाबत माहिती आहे.
advertisement
कुडाळकर यांनी इंटरनेट वापरकर्त्यांना अफवा आणि चुकीच्या माहितीला बळी न पडण्याचा सल्लाही दिला. त्यांनी सांगितलं की, या घटनेमुळे माहिती ऑनलाइन शेअर करण्यापूर्वी त्याची पडताळणी करण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होतं.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Ratan Tata Dog Goa : रतन टाटांच्या निधनानंतर लाडका श्वान गोवाचाही मृत्यू?
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement