बसचालक तुफान नाचला अन् नोकरी गमावून बसला, पण शेवटी चमत्कार घडला!

Last Updated:

लोवराजू नामक या व्यक्तीची ही कहाणी आहे. ते आंध्रप्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातील तेटगुंटा गावातील रहिवासी आहेत. आरटीसीच्या तुनी डेपोमध्ये चालक म्हणून कार्यरत आहे. लोवराजू डान्सरही आहेत. जेव्हा त्यांना ग्रामीण भागात बस चालवावी लागली, त्यावेळी त्यांनी वाहतूक समस्येच्या कारणाच्या निमित्ताने बससमोर डान्स केला. हा व्हिडिओ व्हायरल झाला.

बसचालक लोवराजू
बसचालक लोवराजू
काकीनाडा - सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आहे. अशा परिस्थितीत दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातच एका व्यक्तीचा डान्स व्हायरल झाल्यानंतर त्यांना नोकरीवरुन काढण्यात आले होते. मात्र, लोकल18 च्या बातमीनंतर त्या व्यक्तीला नोकरीवर परत घेण्यात आले. नेमकं काय आहे हे प्रकरण, जाणून घेऊयात.
लोवराजू नामक या व्यक्तीची ही कहाणी आहे. ते आंध्रप्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातील तेटगुंटा गावातील रहिवासी आहेत. तसेच आरटीसीच्या तुनी डेपोमध्ये चालक म्हणून कार्यरत आहे. लोवराजू डान्सरही आहेत. जेव्हा त्यांना ग्रामीण भागात बस चालवावी लागली, त्यावेळी त्यांनी वाहतूक समस्येच्या कारणाच्या निमित्ताने बससमोर डान्स केला. हा व्हिडिओ व्हायरल झाला. तर लोकल18 ने हा बातमी जशी होती, तशीच छापली.
advertisement
विशेष म्हणजे या व्यक्तीच्या डान्सवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि आंध्रप्रदेश सरकारमधील मंत्री नारा लोकेश यांनीसुद्धा लोवराजू यांच्या डान्सवर “गुड डान्स ब्रदर”, अशी प्रतिक्रिया दिली. मंत्र्यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर चालकाला प्रचंड आनंद झाला. मात्र, आरटीसी अधिकाऱ्यांनी या घटनेला अत्यंत गांभीर्याने घेत “कोणतीही अडचण असली तरी रस्त्यावर बस थांबवून नाचणे अयोग्य आहे. नाचायचे असेल तर आटीसीमध्ये येण्याची गरज नाही,” अशी प्रतिक्रिया दिली आणि नोकरीवरुन निलंबित करण्यात आले होते.
advertisement
दरम्यान, लोवराजू यांच्या या बातमीला लोकल18 ने जशीच्या तशी छापले. यानंतर लोवराजून यांनी माध्यमांना सांगितले की, “मी कुठलीही चूक केलेली नाही. बसमध्ये प्रवास करत असलेल्या विद्यार्थ्यांनी मला प्रोत्साहन दिले. त्यामुळे मी फक्त 5 मिनिटे डान्स केला. यामुळे कुणालाही त्रास झाला नाही.” तसेच नारा लोकेश यांना संबोधित करत त्यांनी तुम्हीच माझे आधार आहात, अशी प्रतिक्रिया दिली.
advertisement
लोकल18 च्या बातमीनंतर नारा लोकेश यांनी त्वरित प्रतिक्रिया दिली आणि म्हटले की, “तुमचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. काळजी करू नकोस भाऊ, सध्या मी अमेरिकेत आहे. मी लवकरच भेटायला येईन.” मंत्र्यांच्या या प्रतिक्रियेनंतर त्यांना प्रचंड आनंद झाला आहे.
advertisement
दुसरीकडे तुनी आरटीसी डेपोचे डीएम टी. किरण कुमार यांनी स्वत: लोवराजू यांना कॉल करुन ड्युटीवर परत येण्यास सांगितले. यानंतर मंगळवारी सकाली लोवराजू आरटीसी डेपो पोहोचले आणि तुनी-काकीनाडा बस चालवू लागले. कठीण काळात माझ्यासोबत उभे राहिलेले मीडिया, आणि विशेष म्हणजे माझे भाऊ नारा लोकेश यांचे उपकार मी कधीच फेडू शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी लोकल18 शी बोलताना दिली. दरम्यान, या घटनेची सर्वत्र एकच चर्चा होत आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
बसचालक तुफान नाचला अन् नोकरी गमावून बसला, पण शेवटी चमत्कार घडला!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement