शिक्षिकेची नोकरी सोडून बनली 'शुगर बेबी', 65 जणांसोबत नातं, सांगितलं विवाहित पुरुषांचं धक्कादायक 'सत्य'!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
36 वर्षांच्या महिलेने शिक्षिकेची नोकरी सोडून शुगर बेबी व्हायचा निर्णय घेतला, यानंतर तिने 65 पुरुषांसोबत संबंध ठेवले, ज्यातले बहुतेक पुरुष हे विवाहित होते.
मुंबई : 'पुरुष माझ्यासारख्या महिलेवर पैसे खर्च का करतात, हे मला माहिती आहे. फक्त टाईमपाससाठी नाही तर खरं कारण म्हणजे त्यांना स्वतःच्या घरात एकटेपणा खातो', हे विधान आहे 36 वर्षांच्या कॉनी कीस्टचे. कॉनी किस्टने अलिकडेच तिची शाळेतली शिक्षिकेची नोकरी सोडली. यानंतर आता कॉनी लक्झरी हॉटेल्समध्ये शुगर डेटिंग करते, यातून तिने हाय-प्रोफाइल पुरुषांसोबत करिअर बनवले आहे. एका मुलाची आई असलेली कॉनी आता व्यावसायिक 'शुगर बेबी' आहे, तसंच तिचे 65 पुरुषांसोबत संबंध आहेत.
कॉनीचा शुगर बेबी बनण्याचा हा निर्णय वैयक्तिक आहे. ब्रिस्टलमधील एका शाळेत कॉनी शिक्षिका म्हणून काम करायची, पण कमी पगार मिळत असल्यामुळे तिने ओन्ली फॅन्ससाठी व्हिडिओ बनवायला सुरूवात केली.
65 पुरुषांसोबत संबंध
ओन्लीफॅन्ससाठी व्हिडिओ बनवल्यानंतर 2021 साली ज्याच्यापासून आपल्याला मुल झालं त्याच्यासोबतचं आपलं नातं तुटलं, असं कोनीने सांगितलं. अशा परिस्थितीत
आपण पुन्हा एका प्रेमात पडण्याची तसदी घेतली नाही. पुन्हा प्रेमात पडणं म्हणजे स्वतःला दुखावणे, म्हणून मी शुगर बेबी व्हायचा निर्णय घेतला. यानंतर, माझ्या आयुष्यात 65 पुरुष आले, ज्यांच्याशी माझे संबंध होते. या पुरुषांसोबत मी प्रती तास 20 हजार ते 35 हजार रुपये कमावते, पण माझं ध्येय दरमाह 3,00,000 रुपये कमावण्याचे आहे, असं कॉनी म्हणाली. मी अशा लोकांसोबतही रिलेशन बनवते, जे मला आवडत नाहीत. या कामामुळे मी लक्झरी लाईफ जगते, पण यासाठी मला तडजोड करावी लागते, हेदेखील कॉनीने कबूल केलं.
advertisement
क्लायंट त्यांच्या पत्नीसोबत नाहीत
'माझे बहुतेक क्लायंट हे विवाहित असून ते त्यांच्या पत्नीसोबत बेडरूममध्ये वेळ घालवत नाहीत. त्यांच्यामध्ये कोणताही शारीरिक किंवा भावनिक संबंध उरलेला नाही. त्यांना घरी एकटेपणा जाणवतो. ते अशा व्यक्तीच्या शोधात असतात जो त्यांच्यासोबत प्रेमाने बोलेल आणि त्यांच्या गरजा पूर्ण करेल. हे नाते पैशावर आधारित आहे. माझं काम धोक्याने भरलेले आहे. काही क्लायंट मला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात, तर काही जण मला वेडं करतात', अशी प्रतिक्रिया कोनीने दिली.
advertisement
'मी शाळेमध्ये काम करत असताना एका क्लायंटने मला धमकीचा मेसेज पाठवला होता, त्यामुळे मी खूप अस्वस्थ झाले. भावनिक ओढ टाळण्याची काळजी मी घेते, कारण मला पुन्हा प्रेमात पडायचं नाही. कधीकधी मला एकटेपणा जाणवतो, पण या कामामुळे मला आता नातं बनवणं कठीण होणार आहे. मी माझा मार्ग स्वतः निवडला आहे. मला कोणताही पश्चात्ताप नाही. मी या पैशातून मुलीची चांगली काळजी घेत आहे', असं कॉनी म्हणाली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 07, 2025 4:59 PM IST
मराठी बातम्या/Viral/
शिक्षिकेची नोकरी सोडून बनली 'शुगर बेबी', 65 जणांसोबत नातं, सांगितलं विवाहित पुरुषांचं धक्कादायक 'सत्य'!








