Tiger : मुंबईतील नामांकित मॉलमध्ये वाघाचा धुमाकूळ, Viral Video मागचं सत्य ऐकाल तर तुम्हाला विश्वास बसणार नाही

Last Updated:

मुंबईतील एका प्रसिद्ध मॉलमध्ये वाघ फिरतोय असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या क्लिपमध्ये वाघाला एस्केलेटरजवळ आणि फूड कोर्टसमोर फिरताना दाखवले गेले आहे.

व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
मुंबई : आजच्या सोशल मीडियाच्या दुनियेत रोज काही ना काही वायरल व्हिडिओज पाहायला मिळतात. कधी एखादी मजेशीर घटना, कधी चकित करणारा प्रकार आणि लोक लगेच त्यावर विश्वास ठेवतात, शेअर करतात, कॉमेंट्स करतात. पण या वेगवान डिजिटल युगात एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे. खरं आणि खोटं यातला फरक ओळखणं.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) इतक्या झपाट्याने विकसित होत आहे की आज तिच्या मदतीने अत्यंत रिअलिस्टिक दिसणारे व्हिडिओ आणि फोटो तयार करता येतात. या तंत्रज्ञानामुळे खोटी माहिती खरी वाटू लागते आणि लोक सहज फसतात.
अशाच एका उदाहरणाने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मुंबईतील एका प्रसिद्ध मॉलमध्ये वाघ फिरतोय असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या क्लिपमध्ये वाघाला एस्केलेटरजवळ आणि फूड कोर्टसमोर फिरताना दाखवले गेले आहे. लोक घाबरून धावत सुटतात, दुकानदार शटर बंद करतात आणि संपूर्ण मॉलमध्ये गोंधळ उडाल्यासारखा भासतो.
advertisement
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो कुठचा आहे? कोणत्या मॉलमध्ये असा प्रकार घडला असे असंख्य प्रश्न उभे राहिले. पहिल्या नजरेत हा व्हिडिओ अगदी खरा वाटतो. पण लक्षात ठेवा हा पूर्णपणे AI ने बनवलेला फेक व्हिडिओ आहे.
advertisement
काही वापरकर्त्यांनी याबाबत तथ्य तपास केलं असता लक्षात आलं की हा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI Generated) तंत्राने बनवलेला व्हिडिओ आहे. म्हणजेच मॉलमध्ये खरा वाघ आलेला नाही. हा केवळ सॉफ्टवेअरने तयार केलेला दृश्यभ्रम आहे.
आजच्या काळात अशा फेक किंवा AI-Generated व्हिडिओंनी सोशल मीडियावर मोठं संकट निर्माण केलं आहे. त्यामुळे पुढच्यावेळी जेव्हा कुठला व्हिडिओ तुम्हाला आश्चर्यचकित करेल. तेव्हा तो शेअर करण्याआधी त्याची खात्री जरूर करा. कारण डिजिटल जगातलं सर्वकाही खऱ्यासारखं दिसतं, पण सगळं खरं असतंच असं नाही.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Tiger : मुंबईतील नामांकित मॉलमध्ये वाघाचा धुमाकूळ, Viral Video मागचं सत्य ऐकाल तर तुम्हाला विश्वास बसणार नाही
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement