अरे बापे रे, हा कसला विचित्र मासा! ज्याचे ओठ अन् दात दिसतात अगदी माणसासारखे, पहा VIDEO

Last Updated:

सोशल मीडियावर एका विचित्र माशाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या माशाचे ओठ आणि दात माणसासारखे दिसतात. हा जीव ट्रिगरफिश आहे, जो समुद्राच्या तळाशी राहतो. त्याच्या खाण्याच्या सवयीमुळे त्याचे ओठ सपाट आणि मोठे असतात. त्याचे तीक्ष्ण दात एवढे मजबूत आहेत की ते मेटलही कापू शकतात.

Triggerfish
Triggerfish
सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होतंच असतं. त्यातून नेटकऱ्यांनी मनोरंजन होत असलं तरी काही व्हिडीओ आश्चर्यचकित करणारे असतात. ते पाहून सगळेच विचारात पडतात. हे असं कसं शक्य आहे, असं वाटून जातं. असाच एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे, तो एका माशाचा. हा साधा मासा नाहीये, तर त्याचे ओठ आणि दात हुबेहुभ माणसासारखे आहेत.
मोठ्या ओठांच्या आकर्षक अभिनेत्री आपण पाहिल्या असतील, पण मोठ्या ओठांचा मासा कधीच पाहिला आहे का? या माशाचे ओठ हाॅलिवूड सेलिब्रिटींनाही टक्कर देऊ शकतो. पण नेटकऱ्यांना हा व्हिडीओ पाहून हा विचित्र पाहून प्रश्न पडलाय की, या प्राणी आहे तरी कोण?
माणसांसारखे ओठ असलेला प्राणी
व्हायरल व्हिडिओमध्ये, एका प्राण्याचे मोठे, माणसांसारखे ओठ आणि दात दिसत आहेत. पहिल्या क्षणी पाहताच ते एखाद्या माणसाचे ओठ अगदी जवळून दाखवल्यासारखे वाटतात. मात्र, हे ओठ एका जलचर प्राण्याचे आहेत, ज्याचे दिसणारे दात माणसांसारखे असल्यामुळे ते अधिकच रहस्यमय वाटत आहे.
advertisement
@AMAZlNGNATURE अकाउंटने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हा प्राणी एक प्रकारचा मासा आहे, असं सांगितलं आहे. अनेक नेटिझन्सनी याला ट्रिगर फिश म्हणून ओळखलं, ही प्रजाती समुद्राच्या तळाशी राहते. त्याच्या खाण्याच्या सवयीमुळे त्याचे ओठ सपाट आणि माणसांसारखे दिसतात. त्याचे दातही खूप तीक्ष्ण असतात, इतके की ते धातूही कापू शकतात. रिपोर्ट्सनुसार, ट्रिगरफिशच्या किमान 30-40 प्रजाती आहेत, ज्यापैकी बहुतेक प्रजातींचे ओठ मोठे असतात, ज्यामुळे ते आणखी विचित्र दिसतात.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Viral/
अरे बापे रे, हा कसला विचित्र मासा! ज्याचे ओठ अन् दात दिसतात अगदी माणसासारखे, पहा VIDEO
Next Article
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement