क्रॉसिंगमध्ये रुळावरच ट्रक अडकला अन् एक्स्प्रेस आली समोरून; लोकं किंचाळली, VIDEO
- Published by:Sachin S
Last Updated:
क्रॉसिंगमध्ये ट्रक अडकला असताना एक्स्प्रेसच्या लोकोपायलटला माहिती का दिली नाही, असा सवाल उपस्थितीत झाला आहे.
रेल्वे जात असताना नेहमी क्रॉसिंगवर फाटका लावलं असेल तरी वाहनं घेऊन जाण्याचा जीवघेणा प्रकार अनेक जण करत असतात. असाच एक प्रकार ट्रकचाालकाला अंगाशी आला आहे. क्रॉसिंग लागलेली असताना ट्रक रुळावर अडकला होता. त्यामुळे एक्स्प्रेसने ट्रकला धडक दिली. या अपघातात ट्रकचा चुराडा झाला असून काही दुचाकीस्वार जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील जसीडीह आणि मधुपूर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ही घटना घडली. गोंडा आसनसोल एक्स्प्रेस जाणार असल्यामुळे क्रॉसिंग लागलं होतं. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक थांबवण्यात आली होती. पण, असं असतानाही काही दुचाकीस्वार बाइक फाटका खालून घेऊन गेले. याच दरम्यान एक मालवाहू ट्रक पुढे गेला आणि मध्येच अडकला. पुढे वाहनं थांबलेली असल्यामुळे ट्रकचालकाला पुढे जाता आलं नाही.
advertisement
तितक्याच गोंडा आसनसोल एक्स्प्रेस वेगात आली आणि तिने ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रक रुळावरून बाजूला फेकला गेला. ट्रकबाजूला फेकला गेल्यामुळे काही दुचाकीस्वार ट्रकखाली सापडले. या धडकेत एक्स्प्रेसचा इंजिनचंही नुकसान झालं. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. एक्स्प्रेसचा वेग जास्त नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात काही दुचाकीस्वार जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे.
advertisement
ट्रक अडकला होता तर माहिती दिली का नाही?
दरम्यान, क्रॉसिंगमध्ये ट्रक अडकला असताना एक्स्प्रेसच्या लोकोपायलटला माहिती का दिली नाही, असा सवाल उपस्थितीत झाला आहे. मुळात क्रॉसिंगदरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली होती. गोंडा आसनसोल एक्स्प्रेसच्या लोको पायलटला सिग्नल दिला नव्हता. पण, तरीही एक्स्प्रेस पुढे आली आणि अपघात घडला, अशी माहिती समोर आली आहे.
advertisement
या प्रकरणाची ४ जणांची चौकशी समिती
या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुसरं इंजिन बोलावून एक्सप्रेसला पुढे नेण्यात आलं. ही घटना सकाळी ९.३८ च्या सुमारास घडली होती. या प्रकरणी रेल्वे विभागाने चौकशीचे आदेश दिले आहे. ४ जणांची समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे.
Location :
Jharkhand
First Published :
Jan 22, 2026 5:59 PM IST
मराठी बातम्या/Viral/
क्रॉसिंगमध्ये रुळावरच ट्रक अडकला अन् एक्स्प्रेस आली समोरून; लोकं किंचाळली, VIDEO








