Viral News : या गावात पुरुषांना नो एन्ट्री, महिलांचं चालतं राज्य
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
जगात अशी अनेक रहस्य, घटना, गोष्टी आहेत ज्यांच्याविषयी अनेक लोकांना माहिती नाही. अशीच एक गोष्ट म्हणजे जगात असं एक गाव आहे जिथे फक्त महिलाच राहतात.
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : जगात अशी अनेक रहस्य, घटना, गोष्टी आहेत ज्यांच्याविषयी अनेक लोकांना माहिती नाही. अशीच एक गोष्ट म्हणजे जगात असं एक गाव आहे जिथे फक्त महिलाच राहतात. जिथे पुरुषांची एन्ट्री बॅन आहे. त्या गावात फक्त महिलाच राज्य करतात आणि गावही चालवतात. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल मात्र हे सत्य आहे. यामागे एक कहानी असून इथे असा नियम का आहे याविषयी जाणून घेऊया.
पुरुषांची एन्ट्री बॅन असलेल्या या गावाचं नाव उमोजा आहे. हे गाव केनियामध्ये असून या ठिकाणी स्त्रिया राज्य करतात. या गावाची स्थापना सुमारे 30 वर्षांपूर्वी झाली. येथे राहणाऱ्या महिला निर्वासित आहेत. या सर्व महिला मसाई समाजाचा भाग मानल्या जाणाऱ्या संबुरू जमातीचा एक छोटासा भाग आहे.
advertisement
सांबरु समाजाच्या महिलांना कोणतेही अधिकार नाही. अनेकदा त्यांचा विवाह त्यांच्यापेक्षा खूप मोठ्या पुरुषांसोबत केला जातो. त्यांना कौटुंबिक हिंसाचाराचाही सामना करावा लागतो. 1990 च्या दशकात ब्रिटीश सैनिकांनी त्या भागात या महिलांवर बलात्कार केल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्या पतींनी त्यांना स्वीकारण्यास नकार दिला. इनसाइड ओव्हर वेबसाइटनुसार, त्यावेळी संबुरू जमातीच्या महिलांकडून 1400 बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
advertisement
बलात्कार झालेल्या 15 महिलांना घेऊन लोलोसोली नावाच्या महिलेनं उमोजा नावाचे गाव स्थापन केलं. उमोजा म्हणजे एकता. या गावात महिलांमध्ये एकजूट होती आणि त्यामुळे येथे पुरुषांना प्रवेश पूर्णपणे बंदी करण्यात आला होता.
आता या गावात सुमारे 40 कुटुंबे राहतात, ज्यामध्ये फक्त महिला आणि मुले राहतात. पारंपरिक मण्यांच्या माळा विकून महिला पैसे कमावतात. गावाजवळ राहणारे पुरुष अनेकदा त्यांचा छळ करण्यासाठी त्यांची गुरे चोरतात. पण अशा कृतींमुळे त्या महिलांचे मनोधैर्य खचत नाही. या गावाचा कारभार महिलाच चालवत आहेत, पैसे कमवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 28, 2023 2:26 PM IST