Video : पापा की परी तर बऱ्याच पाहिल्या असणार, पण 'परियों के पापा' सोशल मीडियावर तुफान व्हायरल, हवेत उडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ एकदा पाहाच
- Published by:Devika Shinde
Last Updated:
यासंबंधीत अनेक व्हिडीओ पाहून तुम्ही हसला असणार. पण आता अशीच काहीशी चुक एक व्यक्ती देखील करताना कॅमेरामध्ये कैद झाला ज्यामुळे त्याला 'परीचा पापा' असं म्हटलं गेलं आहे.
मुंबई : सध्या सोशल मीडियावर स्कूटी चालवणाऱ्या तरुणींचे अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल केले जातात. या व्हिडीओत अशा काही मुली असतात ज्यांना नीट गाडी चालवता येत नाही किंवा तिच्या चुकीमुळे दुसऱ्या लोकांचा अपघात झाला किंवा त्यांना ते कन्फ्युज करणारं होतं. अशा मुलींना सोशल मीडियावर 'पापा की परी' असं म्हटलं जातं.
यासंबंधीत अनेक व्हिडीओ पाहून तुम्ही हसला असणार. पण आता अशीच काहीशी चुक एक व्यक्ती देखील करताना कॅमेरामध्ये कैद झाला ज्यामुळे त्याला 'परीचा पापा' असं म्हटलं गेलं आहे.
हा व्हायरल व्हिडीओ इंस्टाग्रामवर @hinglish_storyteller या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एक स्कूटीस्वार वेगात येताना दिसतो आणि थेट रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरवर चढतो. हे एवढ्याचं नव्हतं तर स्कूटी हवेत उडते आणि समोरून येणाऱ्या पिकअप ट्रकच्या थेट बोनटवर आपटते आणि स्कूटीस्वार? तो उडून थेट पिकअप ट्रकच्या विंडशिल्डवर जाऊन बसतो.
advertisement
advertisement
ही धडक खूप जोरदार आणि हृदयाचा ठोका चुकवणारी असली तरी सुदैवाने स्कूटीस्वार बचावला. त्याला गंभीर इजा झाल्याचं दिसून आलं नाही. काही वेळाने तो स्वतःच गाडीच्या बोनवटवरुन उतरतो आणि चालायला लागतो. त्याची गाडीवरुन खाली उतरण्याची स्टाईल खूपच नॉर्मल असते, ज्यामुळे लोकांना हा व्हिडीओ फारच आवडला आहे.
नेटकऱ्यांचे भन्नाट कमेंट्स
या व्हिडिओवर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. कुणी म्हणतंय, “परफेक्ट लँडिंग”, तर कुणी थेट त्याची तुलना अॅक्शन डिरेक्टर रोहित शेट्टीच्या स्टंटमन्सशी करतंय. विशेष म्हणजे अनेकांनी त्याला “पऱ्यांचा पप्पा” असं नावही दिलं आहे.
advertisement
या भन्नाट व्हिडिओला आतापर्यंत 3.6 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
भारतामध्ये दरवर्षी सुमारे 1.5 लाखांहून अधिक लोक रस्ता अपघातात मृत्युमुखी पडतात. ओव्हरस्पीडिंग, चुकीच्या बाजूने गाडी चालवणं, ट्रॅफिक सिग्नल तोडणं आणि नशेत ड्रायव्हिंग ही मुख्य कारणं आहेत. याशिवाय, रस्त्यांचा खराब डिझाईनही अपघाताला जबाबदार असल्याचं ही अनेकांचं म्हणणं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 25, 2025 4:24 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Video : पापा की परी तर बऱ्याच पाहिल्या असणार, पण 'परियों के पापा' सोशल मीडियावर तुफान व्हायरल, हवेत उडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ एकदा पाहाच