viral: वाईनची बॉटल फ्री, फक्त रेस्टॉरंटमध्ये जाऊन करावी लागेल एक गोष्ट!

Last Updated:

नवनवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सना सतत काही ना काही कल्पना लढवाव्या लागतात. काही तरी फ्री देणं ही त्यातल्या त्यात सगळ्यांना आवडणारी कल्पना आहे.

वाईनची बॉटल फ्री, फक्त रेस्टॉरंटमध्ये जाऊन करावी लागेल एक गोष्ट!
वाईनची बॉटल फ्री, फक्त रेस्टॉरंटमध्ये जाऊन करावी लागेल एक गोष्ट!
नवी दिल्ली : नवनवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सना सतत काही ना काही कल्पना लढवाव्या लागतात. काही तरी फ्री देणं ही त्यातल्या त्यात सगळ्यांना आवडणारी कल्पना आहे. त्यामुळे ग्राहक खूश होतात आणि रेस्टॉरंट्सलाही फार काही फरक पडत नाही. इटलीतील एका रेस्टॉरंटने ग्राहकांसांठी अशीच एक ऑफर ठेवली आहे. या ऑफरममुळे रेस्टॉरंट सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे.
ग्राहकांना भन्नाट ऑफर देणारं हे रेस्टॉरंट आहे इटलीतील. स्वस्तात अनलिमिटेड बुफे, एकावर एक फ्री असं काही न करता या रेस्टॉरंटने डिनरसाठी येणाऱ्या ग्राहकांना चक्क एक वानची बाटली फ्री देण्याची ऑफर ठेवली आहे. मात्र, तेवढंच नाही. ती देताना एक अटही घालण्यात आली आहे.
advertisement
‘द गार्डियन’ च्या वृत्तानुसार इटलीतील वेरोनामध्ये ‘अल कॉन्डोमिनियो’ या रेस्टॉरंटने त्यांच्याकडे डिनरसाठी येणाऱ्या ग्राहकांना एक वाईनची बाटली फ्री देण्याची ऑफर ठेवली आहे. त्यासाठीची अट मात्र अनेकांना न रुचणारी आहे. कारण वाईनची बाटली हवी असेल तर डिनरसाठी आलेल्या ग्राहकांना आपले फोन रेस्टॉरंटकडे जमा करायचे आहेत. रेस्टॉरंट मालक एंजेलो लैला यांचं म्हणणं आहे की डिनरसाठी आलेले ग्राहक पूर्ण वेळ मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेले असतात. त्याऐवजी त्यांनी आपल्या कुटुंबाबरोबर गप्पागोष्टी कराव्या, हसतखेळत जेवणाचा आस्वाद घ्यावा यासाठी प्रोत्साहन म्हणून ही ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे डिनरला आल्यानंतर जे आपला फोन
advertisement
रेस्टॉरंटकडे जमा करायला तयार असतील त्यांना वाईनची बाटली फ्री दिली जाईल.
एंजेलो म्हणाल्या की ही ऑफर समजल्यानंतर ग्राहकांचा प्रतिसाद अद्भुत आहे. 90 % ग्राहक फोन जमा करुन फ्री वाईनचा आनंद घेत आहेत. त्यांनी पुढे सांगितलं की फॅमिली बरोबर चांगला वेळ घालवल्यामुळे सगळ्यांनाच आनंद मिळतो. रेस्टॉरंटचं वातावरणही त्यामुळे छान राहतं. आम्हाला इतर रेस्टॉरंट्सपेक्षा वेगळं रेस्टॉरंट उभं करायचं होतं. त्यामुळेच ग्राहकांनी आपला आनंद साजरा करताना मोबाईलपासून दूर राहावं असं आम्हाला वाटलं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
advertisement
‘अल कॉन्डोमिनियो’ हे असा विचार करणारं वेरोनातील पहिलं रेस्टॉरंट मानलं जात आहे. मात्र, इतर काही कॅफेजमध्ये ग्राहकांनी आपले फोन जमा करुन गप्पागोष्टी आणि खाण्यापिण्यात वेळ घालवला तर व्हाउचर्स दिली जात असल्याचं या रिपोर्टमधून सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या/Viral/
viral: वाईनची बॉटल फ्री, फक्त रेस्टॉरंटमध्ये जाऊन करावी लागेल एक गोष्ट!
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement