Wedding News: वधूला जबरस्ती वरमाला घालत होता वर, पुढे घडला विचित्र प्रकार
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
लग्नसराईचा हंगाम सुरु असून अनेक लग्नाच्या घटना समोर येत आहेत. भारतात तर अनेक हटके लग्न पहायला मिळतात. लग्न समारंभात बऱ्याच वेगवेगळ्या घटना घडतात.
नवी दिल्ली : लग्नसराईचा हंगाम सुरु असून अनेक लग्नाच्या घटना समोर येत आहेत. भारतात तर अनेक हटके लग्न पहायला मिळतात. लग्न समारंभात बऱ्याच वेगवेगळ्या घटना घडतात. कधी मजेशीर, विचित्र, भांडण, अशा घटना समारंभात समोर येतच राहतात. सध्या एक वधू वराचा व्हिडीओ समोर आलाय. ज्यामध्ये दोघांची वरमाला घालण्याची विधी सुरु आहे. मात्र पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही डोक्यावर हात मारुन घ्याल.
वधू वरांचा वरमालाचा कार्यक्रम सुरु होता. वधूला दोन व्यक्तींनी उचलून घेतलं होतं जेणेकरुन वर तिला सहज हार घालू नये. मात्र वर जे करतो ते पाहून तुम्ही डोक्याला हात माराल आणि तुम्हाला हसूही आवरणार नाही.
लग्न समारंभातील समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, स्टेजवर वधू वरांचा वरमाला कार्यक्रम सुरु आहे. वर वधूला वरमाला घालण्यासाठी एकदम रेडी आहे. मात्र तेवढ्याच दोन व्यक्ती वधू उचलतात. जेणेकरुन वर तिला सहज हार घालू नये. थोडी मेहनत करुन त्याला वधू मिळावी. वर वरमाला घालण्यासाठी खुर्चीवर चढून उडी मारतो आणि वधूला हार घालतो. मात्र या चक्करमध्ये समोर असलेले व्यक्ती वधूला घेऊन खाली पडतात.
advertisement
वधू आणि नातेवाईक खाली पडतात तरी वर त्यांना पाहत राहतो. त्यांना उठण्यास मदतही करत नाही. vicky.up.92 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काहीच वेळात व्हिडीओ इंटरनेटवर चर्चेत आला आणि व्हिडीओवर भरपूर कमेंटही पहायला मिळाल्या. अनेकांनी म्हटलं वधूसोबत मोये मोये सीन झाला. अशा मजेशीर कमेंट व्हिडीओवर येत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 22, 2024 7:19 PM IST