advertisement

काहींनी मारल्या लाथाबुक्या, तर काहींनी खुर्च्या; शुल्लक कारणावरुन लग्नमंडप झालं कुस्तीचं मैदान

Last Updated:

व्हिडीओ फक्त लग्नाशी संबंधित आहे. यामध्ये वधू-वर एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

लग्नातील भांडणाचा व्हायरल व्हिडीओ
लग्नातील भांडणाचा व्हायरल व्हिडीओ
मुंबई : सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडीओ दररोज व्हायरल होतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक तर कधी एखाद्या क्षणाचे असतात. पण सध्या समोर आलेला व्हिडीओ थोडा वेगळा आहे. ज्यामुळे तो फार कमी वेळात जोरदार व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ लग्नातील भांडणाचा आहे आणि भांडण पाहायला कोणाला आवडत नाही???
याच कारणामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वाच चर्चीत व्हिडीओ आहे. खरंतर वरातीच्यावेळी दोन पक्षांमध्ये छोट्याश्या मुद्द्यावरून बाचाबाची होते आणि नंतर याचं रुपांतर मारामारीत होतं. नुकताच असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो व्हायरल होत आहे.
व्हिडीओ फक्त लग्नाशी संबंधित आहे. यामध्ये वधू-वर एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
advertisement
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की किती लोक लग्नाला आले होते. सर्वजण जेवण करताना दिसतात. अचानक क्षुल्लक गोष्टीवरून सभागृहात वाद वाढतो. त्यानंतर लोकांचा संयम सुटतो आणि त्यांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
लग्नात जेवण उरकल्यावर हा वाद सुरू झाला आणि तो वाढला असे सांगितले जात आहे. काही लोक दोन्ही बाजूंमधील भांडण थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण गोंधळ घालणाऱ्यांना काही फरक पडत नाही. लोक एकमेकांना लाथा-बुक्के मारत आहेत तसेच खुर्च्यांवरून भांडत आहेत.
advertisement
व्हायरल होत असलेला व्हिडिओ लखनऊच्या अमिनाबाद भागात असलेल्या धर्मशाळेचा असल्याचे सांगण्यात येत आहे. लग्नात या व्हिडीओमध्ये जसा सीन दिसतो तसा प्रकार इतरत्र सहसा दिसत नाही. @SabirSh48723440 नावाच्या X हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
काहींनी मारल्या लाथाबुक्या, तर काहींनी खुर्च्या; शुल्लक कारणावरुन लग्नमंडप झालं कुस्तीचं मैदान
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement