Viral Video: 'KISS कर नाहीतर...'; नवरदेवाची नवरीकडे स्टेजवरच विचित्र मागणी; VIDEO पाहून भडकले नेटकरी
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
व्हिडिओमध्ये वधू आणि वर हातात पुष्पहार घेऊन स्टेजवर उभे असल्याचे दिसत आहे. त्यानंतर वराने वधूकडून विचित्र मागणी केली.
नवी दिल्ली 11 डिसेंबर : सध्या देशात लग्नाचा सीजन सुरू आहे. वधू-वर आपला विवाह सोहळा अविस्मरणीय बनवण्यासाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या याचाच प्रयत्न करत असलेल्या वराचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो वरमाला घालताना स्टेजवरच आपल्या वधूकडून विचित्र मागणी करताना दिसतो. व्हिडिओ पाहून काही लोक भडकले आहेत . त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये आपली नाराजी व्यक्त केली आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @chaprazila19 नावाच्या युजरने पोस्ट केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, 'वराची मागणी पूर्ण होईपर्यंत त्याने वधूला वरमाला घालू दिली नाही.' आता वराने नवरीकडे काय विचित्र मागणी केली होती हे जाणून घेण्यासाठी, तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. नवरदेवाचा हा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे, ज्याला लोक पसंतही करत आहेत. 9 डिसेंबर रोजी पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओला एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय, मोठ्या संख्येनं लोकांनी व्हिडिओवर मजेदार कमेंट्स देखील केल्या आहेत, ज्या वाचून तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल.
advertisement
advertisement
व्हिडिओमध्ये वधू आणि वर हातात पुष्पहार घेऊन स्टेजवर उभे असल्याचे दिसत आहे. त्यानंतर वराने वधूकडून विचित्र मागणी केली. वधूने त्याची मागणी पूर्ण केल्याशिवाय तो तिला हार घालू देत नाही. शेवटी, वधू-वराची मागणी पूर्ण करते. मग वर तिला हार घालण्याची परवानगी देतो. यानंतर लोक जल्लोष करत असल्याचा आवाजही येतो
advertisement
एका इंस्टाग्राम युजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं की, 'आमच्या घरी असं घडलं असतं तर आजोबा काठी घेऊन स्टेजवर आले असते आणि मग नवरदेवाचं काय झालं असतं हे देव जाणो.' दुसऱ्या व्यक्तीने लिहिलं, 'हिंदू संस्कृतीतील हे असं काही करत नाही, इथे काहीतरी आहे मर्यादा आहेत. प्रेम तर सगळेच करतात. आजच्या पिढीला पाश्चिमात्य संस्कृती का आवडते ते कळत नाही.' तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिलं 'हे चुकीचं आहे, सभ्य समाजात असं घडत नाही'
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 11, 2023 11:03 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Viral Video: 'KISS कर नाहीतर...'; नवरदेवाची नवरीकडे स्टेजवरच विचित्र मागणी; VIDEO पाहून भडकले नेटकरी








