Interesting Facts : लहान मुलं थोड्या थोड्या वेळाने डोळे का चोळतात? संशोधकांनी शोधलं नेमकं कारण

Last Updated:

आपल्या भावना व्यक्त करण्याकरता ते रडणं, ओरडणं, हातवारे अशा कृतींचा आधार घेतात. लहान मुलं बरेचदा डोळेही चोळतात. मुलं डोळे चोळत असतील, तर त्यांना झोप आली, असा सर्वसाधारणपणे आपला समज असतो.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र
मुंबई : लहान बाळं खूप सूचक हावभाव करतात. आपल्या भावना व्यक्त करण्याकरता ते रडणं, ओरडणं, हातवारे अशा कृतींचा आधार घेतात. लहान मुलं बरेचदा डोळेही चोळतात. मुलं डोळे चोळत असतील, तर त्यांना झोप आली, असा सर्वसाधारणपणे आपला समज असतो. शास्त्रज्ञांनी त्यामागचं खरं कारण शोधून काढलंय. लहान बाळं त्यांच्या कृतीतून बरंच काही सांगत असतात. मुलं डोळे चोळत असली, की त्यांना झोप आली आहे, असं आपल्याला वाटतं.
लहान मुलांच्या डोळे चोळण्यामागे काय कारण असतं या बाबत शास्त्रज्ञांनी संशोधन केलं. अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक डॉ. रेबेका डुडोविट्ज यांनी लाइव्ह सायन्सला सांगितलं, की मुलं डोळे का चोळतायत, असं आपण त्यांना विचारू शकत नाही. केवळ ते समजून घेऊ शकतो. मुलं थकली असतील, तर ती डोळे चोळतात. मुलांच्या डोळ्यांच्या स्नायूंमध्ये ताण असला की ती डोळे चोळतात. स्नायूंना विश्रांती देण्यासाठीच ते केलं जातं. संपूर्ण दिवस बैठं काम केल्यावर खांद्यांना मालिश करायची इच्छा होते, तसंच डोळ्यांमधील लक्ष केंद्रीत करण्याचे स्नायू चोळल्यावर त्यांना आराम पडतो.
advertisement
डोळ्यांच्या थकव्यावर उपाय
लहान बाळं त्यांचा बहुतांश वेळ आजूबाजूच्या वस्तूंचं निरीक्षण करण्यात घालवतात. त्या वस्तू पाहून पाहून त्यांचे डोळे थकतात. प्रौढांच्या तुलनेत लहान मुलं एका मिनिटात खूप कमी वेळा पापण्या मिटतात. त्यामुळे त्यांचे डोळे लगेच कोरडे पडतात. पापण्यांची सतत उघडझाप केली म्हणजे डोळ्यांतून थोडं पाणी येतं, त्यामुळे स्नायूंचा ओलसरपणा टिकून राहतो. लहान मुलं पापण्यांची उघडझाप जास्त करत नाहीत, त्यामुळे त्यांच्या कॉर्नियावर नेहमी कोरडे डाग पडतात. ते घालवण्यासाठी मुलं सतत डोळे चोळतात.
advertisement
सतत डोळे चोळणं चांगलं नाही
लहान मुलांचं सतत डोळे चोळणं मात्र चांगलं नसतं. सातत्याने तसं केल्याने कदाचित दृष्टिदोष निर्माण होऊ शकतो. शास्त्रज्ञांच्या मते, थकवा असताना डोळे चोळणं आरामदायी वाटतं. त्याचं कारण डोळे चोळल्यानं ट्रायजेमिनल आणि व्हेगस नर्व्हस उत्तेजित होतात. यामुळे तिथला रक्तदाब कमी होतो. ही प्रक्रिया मेंदूपासून डोळ्यांपर्यंत आणि मेंदूपासून संपूर्ण शरीरात सुरू असते. डोळे थकले असतील, कोरडे पडले असतील, तर त्यांना विश्रांती मिळावी, याकरता मुलं डोळे चोळतात.
advertisement
लहान मुलं असो किंवा प्रौढ व्यक्ती, डोळ्यांना थकवा जाणवत असेल तर तो घालवण्यासाठी झोप गरजेची असते. डोळे चोळणं हा या प्रक्रियेचाच एक भाग असतो.
मराठी बातम्या/Viral/
Interesting Facts : लहान मुलं थोड्या थोड्या वेळाने डोळे का चोळतात? संशोधकांनी शोधलं नेमकं कारण
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement