सोयाबीनच्या दरात घसरण की तेजी? आजचा भाव काय? मार्केटमधून आली मोठी अपडेट

Last Updated:

Soybean Market Update : राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन आणि कापूस पिकाचं मोठं नुकसान झालं आहे.

soybean market
soybean market
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन आणि कापूस पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे हाती लागलेले सोयाबीन आता शेतकरी बाजार आणत आहेत. आणि त्याला योग्य भाव मिळेल आशा लावून बसले आहेत. राज्यात १५ नोव्हेंबरपासून सोयाबीन खरेदी सुरू केली जाणार आहे. परंतु सध्याचे मार्केट काय आहे? किती बाजारभाव मिळतोय? हेच आपण जाणून घेणार आहोत.
आजचे सोयाबीन बाजारभाव
१० नोव्हेंबर २०२५ रोजीच्या बाजारभावांनुसार, जळगाव जिल्ह्यात सोयाबीनला ४,००० ते ४,४८५ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. नागपूरमध्ये दर ३,९०० ते ४,५५२ रुपयांच्या दरम्यान आहे, तर पालम बाजारात सोयाबीनला ४,५०० रुपये दर कायम आहे. दरांचा हा कल पाहता, सध्या बाजारात ४,००० ते ४,५०० रुपये प्रति क्विंटल इतका सरासरी दर दिसून येतो.
advertisement
बाजारातील सध्याची परिस्थिती
सोयाबीनचे दर सध्या ४,००० ते ४,५०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहेत. काही ठिकाणी दर्जानुसार थोडाफार फरक दिसून येत आहे. चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला जास्त भाव मिळत असला तरी, आवक वाढल्यामुळे दरात स्थिरता आहे.
शेतकऱ्यांची मागणी काय?
सध्याच्या दराने उत्पादन खर्च निघणे कठीण आहे. खत, मजुरी आणि वाहतुकीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांना किमान ५,५०० रुपये दर अपेक्षित आहेत. मात्र बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकरी सरकारी खरेदी केंद्रांकडे अपेक्षेने पाहत आहेत.
advertisement
१५ नोव्हेंबरपासून खरेदी सुरू होणार
राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार, १५ नोव्हेंबरपासून सोयाबीन खरेदीला सुरुवात होईल. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. कृषी विभागाच्या माहितीप्रमाणे, हमीभाव ५,३२८ रुपये प्रति क्विंटल इतका निश्चित करण्यात आला आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या उत्पादनानुसार खरेदी केंद्रावर वेळापत्रक दिले जाईल.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
सोयाबीनच्या दरात घसरण की तेजी? आजचा भाव काय? मार्केटमधून आली मोठी अपडेट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement