पुलवामापेक्षाही भयंकर कट? 360 किलो विस्फोटक अन् डॉक्टरचं हादरवणारं टेरर मॉड्यूल
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
फरीदाबादमध्ये डॉक्टर मुजम्मिलकडून ३६० किलो स्फोटक जप्त, ISIS संबंधाची चौकशी सुरू. सतेंद्र कुमार गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली गुप्त ऑपरेशनमध्ये दोन आरोपी अटकेत.
३०० किलोहून जास्त विस्फोटक आणि थंड डोक्याने भयंकर मोठ्या स्फोटाचं प्लॅनिग सुरू असतानाच छापेमारी करून पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा व्यक्ती ISIS च्या संपर्कात आहे की नाही याची चौकशी सुरू आहे. हरियाणातील फरीदाबाद इथे सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या सीक्रेट मिशन दरम्यान एका डॉक्टरच्या घरावर छापेमारी केली. तिथून तब्बल ३६० किलो स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आणि त्यानंतर सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले. जप्त करण्यात आलेल्या या प्रचंड स्फोटकांच्या साठ्यावरून हा डॉक्टर देशात मोठा घातपात करण्याच्या तयारीत होता असं समोर आलं आहे.
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या भयंकर हल्ल्यात दहशतवाद्यांनी केवळ ६० किलो आरडीएक्स वापरले होते, ज्यात आपले ४० जवान शहीद झाले होते. या तुलनेत फरीदाबादमध्ये सापडलेला ३६० किलो स्फोटक साठा पुलवामा हल्ल्यात वापरलेल्या स्फोटकांपेक्षा सहापट अधिक आहे. यामुळे, जर हा स्फोटक साठा वापरला गेला असता तर देशात किती भयंकर आणि मोठी खळबळ उडू शकते याचा विचार न केलेला बरा.
advertisement
अमोनियम नायट्रेट आणि शस्त्रे
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली ही कारवाई केली. फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात ३६० किलो अमोनियम नायट्रेट जप्त केलं. अमोनियम नायट्रेटचा उपयोग कमी तीव्रतेचे आणि उच्च तीव्रतेचे स्फोटक तयार करण्यासाठी केला जातो. देशात यापूर्वी झालेल्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये स्फोटक तयार करण्यासाठी अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आला होता. स्फोटक साठ्यासोबतच, या ठिकाणाहून एक एसॉल्ट रायफल आणि इतर काही शस्त्रेही हस्तगत करण्यात आली आहेत.
advertisement
१५ दिवसांचे गुप्त ऑपरेशन
फरीदाबादचे पोलीस आयुक्त सतेंद्र कुमार गुप्ता यांनी या कारवाईबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, या संपूर्ण दहशतवादी मॉड्युलचा पर्दाफाश करण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून एक संयुक्त (Joint) आणि अतिशय गोपनीय ऑपरेशन सुरू होते. या कारवाईची कोणालाही भनक लागू नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन जणांना अटक केली आहे. एक फरीदाबाद येथून आणि दुसरा सहारनपूर येथून. फरीदाबाद येथून अटक झालेला आरोपी अल फिला नावाच्या विद्यापीठात डॉक्टरीचे शिक्षण घेत होता.
advertisement
या मॉड्युलमधील डॉक्टर मुजम्मिल नावाच्या एका फिजिशियनला नऊ दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती. मुजम्मिलने फरीदाबादच्या धौज पोलिस स्टेशन परिसरात भाड्याने एक खोली घेतली होती, जिथे त्याने हा स्फोटक साठा ठेवला होता. पोलिस आयुक्त सतेंद्र कुमार गुप्ता यांनी राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेऊन या प्रकरणातील अनेक तपशील सध्या सार्वजनिक करता येणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, या मॉड्युलमधील एक डॉक्टर अद्यापही फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन अजूनही सुरू आहे.
view commentsLocation :
Faridabad,Faridabad,Haryana
First Published :
November 10, 2025 1:12 PM IST


