Success Story : चांगल्या पगाराची नोकरी सोडली! अंजीर शेतीला केली सुरवात,तरुण करतोय कोट्यवधी रुपयांची उलाढाल

Last Updated:

Farmer Success Story : आजच्या काळात उच्चशिक्षित तरुणांना स्थिर आणि समाधानकारक नोकरी मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून,अनेक तरुण लहान-मोठ्या नोकऱ्यांसाठी वणवण भटकत आहेत.

News18
News18
अहिल्यानगर : आजच्या काळात उच्चशिक्षित तरुणांना स्थिर आणि समाधानकारक नोकरी मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून,अनेक तरुण लहान-मोठ्या नोकऱ्यांसाठी वणवण भटकत आहेत. त्यामुळे नोकरीच्या अस्थिरतेमुळे आणि स्वतःच्या करिअरवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक तरुण व्यवसायाकडे वळू लागले आहेत.
परंतु, एका बाजूला चांगली नोकरी मिळत नसल्याने त्रस्त असलेले तरुण दिसतात, तर दुसऱ्या बाजूला काही उच्चशिक्षित तरुण स्वतःहून मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडून शेती आणि व्यवसायाकडे वळत आहेत. शेती क्षेत्रात पाय रोवणं आणि त्यात यश मिळवणं हे सोपं नाही, मात्र तरीही काही जिद्दी तरुण आपले निर्णय ठामपणे घेताना दिसतात. याचंच उदाहरण म्हणजे समीर डोंबे, ज्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंगची नोकरी सोडून अंजीर शेतीत मोठं यश मिळवलं.
advertisement
चांगली नोकरी सोडून शेती क्षेत्रात प्रवेश
दौंड येथे राहणारे समीर डोंबे यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रति महिना 40,000 रुपये पगाराची नोकरी मिळवली होती. मात्र, नोकरीत मन रमत नसल्याने त्यांनी मोठा निर्णय घेतला आणि शेती व्यवसायाकडे वळण्याचा विचार केला. त्यांचा निर्णय कुटुंबाला पटला नाही. शेतीत फारसं यश मिळणार नाही, हा कुटुंबीयांचा विश्वास होता.
advertisement
पण समीर डोंबे आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि अंजीर शेतीचा वारसा पुढे नेण्याचा निश्चय केला. सुरुवातीला कुटुंबाचा फारसा पाठिंबा नव्हता, पण जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी मोठं यश मिळवलं.
अंजीर शेतीतून दीड कोटींचा व्यवसाय
शेतीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करत अडीच एकर जागेपासून सुरू केलेल्या अंजीर शेतीचं क्षेत्र आता पाच एकरांपर्यंत वाढवलं आहे. केवळ पारंपरिक शेती न करता, त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्पादन आणि विक्री वाढवली.
advertisement
त्यांचा व्यवसाय इतका वाढला की, आज ते अंजीर विक्रीतून वर्षाला सुमारे दीड कोटी रुपयांची उलाढाल करत आहेत. त्याचबरोबर, त्यांनी अंजीर प्रक्रिया करणारा स्वतःचा युनिट देखील सुरू केला आणि 'पवित्रक' नावाने स्वतःचा ब्रँड विकसित केला.
ऑनलाइन मार्केटिंग आणि लॉकडाऊनमधील संधी
समीर डोंबे यांनी फक्त पारंपरिक विक्रीवर भर न देता ऑनलाइन विक्रीलाही चालना दिली. त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली आणि त्यांच्या ब्रँडचा विस्तार केला.
advertisement
कोरोना काळात जेव्हा बाजारपेठा ठप्प होत्या, त्या वेळीही त्यांनी ऑनलाईन माध्यमातून आपली विक्री सुरू ठेवली. मोठ्या सुपरमार्केटमध्ये फळांची कमतरता असतानाही, त्यांनी फक्त ऑनलाईन विक्रीद्वारे 13 लाख रुपयांची कमाई केली.
यशस्वी भविष्याचा मार्ग
समीर डोंबे यांनी पारंपारिक अंजीर शेतीपासून सुरुवात केली असली, तरी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने आपल्या व्यवसायाला मोठं यश मिळवलं.आज त्यांचा व्यवसाय लाखो रुपयांची उलाढाल करतो आणि त्यांनी तरुणांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : चांगल्या पगाराची नोकरी सोडली! अंजीर शेतीला केली सुरवात,तरुण करतोय कोट्यवधी रुपयांची उलाढाल
Next Article
advertisement
Nanded Crime News : 'तुझं लग्न लावून देतो',  आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

View All
advertisement