परतीच्या पावसाने झोडपलं, केळी उत्पादनात मोठी घट, बीडमधील परिस्थिती चिंताजनक

Last Updated:

beed banana farming - केळीचे पीक हे कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देणारा पीक ठरते. मात्र, बीडमध्ये यावर्षी केळीच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे.याचबाबत लोकल18 च्या टीमचा हा विशेष आढावा.

+
बीड

बीड केळी शेती

प्रशांत पवार, प्रतिनिधी
बीड - बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पिकांना पावसाचा फटका बसला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षी पाऊस जास्त प्रमाणात असल्याने काही ठिकाणी पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. यामध्ये केळी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने केळीच्या उत्पादनात होणारी घट वाढली आहे. याचबाबत बीड जिल्ह्यातील परिस्थितीचा लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
advertisement
अगदी मागील वर्षाचे तुलनेत विचार केला तर यावर्षी केळी पिकाच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. यावर्षीही शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पावसाचा मोठा फटका हा पिकांना बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे.
advertisement
केळीचे पीक हे कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देणारा पीक ठरते. मात्र, यावर्षी केळीच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे. 4 वर्षांपासून केळीची शेती करणाऱ्या किरण फपाळ या शेतकऱ्याला दरवर्षी 6 ते 7 लाखांचे उत्पन्न मिळायचे. मात्र, त्या तुलनेत यावर्षी मोठी घट झाली असून दोन लाखांपर्यंत उत्पन्न होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
advertisement
यावर्षी बीड जिल्ह्यातील अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागला आहे. केळीचे उत्पादनात मोठी घट पाहता शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा फटका - 
दरम्यान, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी घरांची पडझडही झाली आहे. यातच आता बीड जिल्ह्याचा विचार केला असता याठिकाणी परतीच्या पावसाचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
मराठी बातम्या/कृषी/
परतीच्या पावसाने झोडपलं, केळी उत्पादनात मोठी घट, बीडमधील परिस्थिती चिंताजनक
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement