मांजराने पोपटाचा पिंजरा पाडला; पुण्यातील शेजारी रस्त्यावरच भिडले, तुफान हाणामारी अन्..पोलिसात प्रकरण
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
आता पुण्यातून एक अजब घटना समोर आली आहे. शहरात पाळीव प्राण्यांच्या वादातून शेजाऱ्यांमधील वाद विकोपाला गेल्याची विचित्र घटना समोर आली आहे
पुणे : पुण्यात अगदी काहीही घडू शकतात, असं म्हणतात ते खरंच आहे. आता पुण्यातून एक अजब घटना समोर आली आहे. शहरात पाळीव प्राण्यांच्या वादातून शेजाऱ्यांमधील वाद विकोपाला गेल्याची विचित्र घटना समोर आली आहे. ताडीवाला रोड परिसरात एका मांजराने वारंवार पोपटाचा पिंजरा पाडल्याने दोन शेजाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणी मांजराच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा विचित्र प्रकार सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
नेमकी घटना काय?
फिर्यादी अभिषेक सिंग यांनी घरी पोपट पाळला असून, त्याचा पिंजरा घरासमोर ठेवलेला असतो. शेजारी राहणारे दिनेश पोताबत्तोनी यांचे मांजर वारंवार सिंग यांच्या पोपटाच्या पिंजऱ्याशी चाळे करत असे. अनेकदा मांजराने पिंजरा ढकलून दिल्याने पोपटही भयभीत व्हायचा. या त्रासाबाबत सिंग यांनी दिनेश यांना मांजरीवर लक्ष ठेवण्यास सांगितल्याने वादाची ठिणगी पडली.
advertisement
वाद पोहोचला पोलीस ठाण्यापर्यंत
तोंडी वादाचं रूपांतर काही वेळातच हाणामारीत झालं आणि दोन्ही कुटुंब एकमेकांशी भिडले. रस्त्यावर येऊन दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. या मारहाणीत अभिषेक सिंग हे जखमी झाले असून, त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी मांजराचे मालक दिनेश पोताबत्तोनी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 13, 2026 1:18 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
मांजराने पोपटाचा पिंजरा पाडला; पुण्यातील शेजारी रस्त्यावरच भिडले, तुफान हाणामारी अन्..पोलिसात प्रकरण








