मित्राने दिला सल्ला अन् केली भुईमूग लागवड, तरुण शेतकऱ्याने साधली आर्थिक प्रगती, एकदा कमाई पाहाच Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
बीड जिल्ह्यातील सचिन राठोड हा तरुण शेतकरी भुईमूग शेतीतून चांगले उत्पन्न मिळवत आहे. पारंपरिक पिके घेत असताना त्यांनी आधुनिक शेती तंत्रांचा अवलंब करून आपल्या उत्पादनात वाढ केली आहे.
प्रशांत पवार, प्रतिनिधी
बीड : शेतकरी सध्या पारंपरिक पिकाची शेती करतानाच आधुनिक शेतीकडे वळत आहेत. बीड जिल्ह्यातील सचिन राठोड हा तरुण शेतकरी देखील भुईमूग शेतीतून चांगले उत्पन्न मिळवत आहे. पारंपरिक पिके घेत असताना त्यांनी आधुनिक शेती तंत्रांचा अवलंब करून आपल्या उत्पादनात वाढ केली आहे. केवळ एक एकर क्षेत्रात भुईमुगाची लागवड करून त्यांनी लाखोंचा नफा मिळवण्याचा मार्ग मिळवला आहे. खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांत भुईमुगाचे उत्पादन घेऊन ते वर्षभर शेतीतून आर्थिक स्थैर्य निर्माण करत आहेत.
advertisement
सचिन राठोड यांचा सुरुवातीला पारंपरिक पिकांकडे अधिक कल होता. मात्र एका मित्राने त्यांना भुईमूग लागवडीचा सल्ला दिला. सुरुवातीला प्रयोग म्हणून त्यांनी थोड्याच क्षेत्रात भुईमूग पेरणी केली. पहिल्या हंगामातच चांगले उत्पादन आणि बाजारात चांगला दर मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला. या अनुभवातून प्रेरणा घेत त्यांनी आपल्या संपूर्ण एक एकर जमिनीत भुईमुगाची शेती सुरू केली आणि त्यातून मोठे यश मिळवले.
advertisement
खडकाळ शेत जमिनीतून पिकवलं सोनं, जालन्याच्या शेतकऱ्याला बटाटे शेतीमधून 28 लाखांचं उत्पन्नसचिन यांनी भुईमूग शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी सुधारित बियाणे, ठिबक सिंचन आणि सेंद्रिय खतांचा योग्य वापर केला. कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळवता येईल याकडे त्यांचा भर राहिला. भुईमूग हे तेलबिया पीक असल्याने त्याला बाजारात कायम चांगली मागणी असते. तसेच भुईमुगाच्या पेंड आणि टरफलांचा उपयोग पशुखाद्यासाठी करता येतो त्यामुळे संपूर्ण पीक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते.
advertisement
एका एकरातून सरासरी 15-20 क्विंटल भुईमूग उत्पादन मिळते. बाजारपेठेत भुईमूगाला दरवर्षी चांगला दर मिळतो. योग्य नियोजन, मेहनत आणि शेती व्यवस्थापन यामुळे वर्षाला किमान तीन लाख रुपये निव्वळ नफा मिळतो. पारंपरिक पिकांच्या तुलनेत भुईमूग अधिक फायदेशीर ठरत असल्याने भविष्यातही याच शेतीवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे, असं सचिन राठोड सांगतात.
advertisement
सचिन राठोड यांचा हा प्रवास इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. कमी क्षेत्रात जास्त नफा मिळवण्यासाठी भुईमूगासारख्या व्यावसायिक पिकांची लागवड फायदेशीर ठरते हे त्यांनी सिद्ध केले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, योग्य व्यवस्थापन आणि बाजारपेठेचा अभ्यास केल्यास शेतीतून अधिक उत्पन्न मिळवता येते. सचिन यांसारख्या प्रयोगशील शेतकऱ्यांकडून प्रेरणा घेऊन अनेक तरुण शेतीत यशस्वी उद्योजक बनू शकतात.
advertisement
view comments
Location :
Bid,Maharashtra
First Published :
February 08, 2025 4:15 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
मित्राने दिला सल्ला अन् केली भुईमूग लागवड, तरुण शेतकऱ्याने साधली आर्थिक प्रगती, एकदा कमाई पाहाच Video

