advertisement

Agri Stack yojana : राज्यात 16 तारखेपासून Agri Stack योजना सुरू होणार, शेतकऱ्यांना मिळणार हे फायदे

Last Updated:

Agriculture News : अॅग्रिस्टॅक योजनेचा उद्देश हा सरकार राबवत असलेल्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे असा आहे. या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. या योजेतंर्गत शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी त्यांच्या शेतीचा संलग्न माहिती संच तयार केला जाणार आहे.

अॅग्रिस्टॅक योजना
अॅग्रिस्टॅक योजना
मुंबई : केंद्र सरकार डिजिटल पद्धतीचा वापर करून शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी सरकार अॅग्रिस्टॅक योजना राबवणार आहे. यामुळे योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. सोमवारपासून या योजनेला राज्यभरात सुरवात होणार आहे. या योजनेमार्फत प्रत्येक गावात गावनिहाय अभियान राबवले जाणार आहे. केंद्र सरकारने अॅग्रिस्टॅक योजना योजनेसंदर्भातील मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
अॅग्रिस्टॅक योजनेचा उद्देश हा सरकार राबवत असलेल्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे असा आहे. या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. या योजेतंर्गत शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी त्यांच्या शेतीचा संलग्न माहिती संच तयार केला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची माहिती आणि आकडेवारी कळण्यास मदत होणार आहे. या योजनेला येत्या सोमवारपासून सुरवात केली जाणार असून प्रत्येक गावामध्ये या संबंधी शिबीर राबवले जाणार आहे.
advertisement
पुन्हा केवायसी करण्याची गरज नाही
अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक कर्ज, पीएम किसान योजना आणि पीक विम्यासह सर्व सरकारी योजनांचा लाभ सहज मिळेल. यासाठी देशभरात शेतकरी नोंदणी कार्यक्रमाला गती देण्यात येत आहे. या कार्यक्रमात खसरा, खतौनी या शेतकऱ्यांच्या नोंदी त्यांच्या आधारशी जोडल्या जाणार आहेत. याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होईल कारण त्यांना सरकारी योजनांसाठी पुन्हा पुन्हा केवायसी करण्याची गरज भासणार नाही.
advertisement
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रथम नोंदणी करावी लागणार आहे. अहवालानुसार शेतकऱ्यांना हे काम 31 डिसेंबर 2024 पूर्वी पूर्ण करावे लागणार आहे. यासाठी तुम्ही विभागाच्या https://upfr.agristack.gov.in या वेब पोर्टलवर जाऊ शकता किंवा तुमच्या जवळच्या नोंदणी शिबिरात किंवा ग्राम पंचायतमध्ये भेट देऊनही नोंदणी करू शकता.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Agri Stack yojana : राज्यात 16 तारखेपासून Agri Stack योजना सुरू होणार, शेतकऱ्यांना मिळणार हे फायदे
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement