22 दिवसांमध्ये पिक हातात, खर्च फक्त 10 हजार; 3 लाख कमाईची हमी!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
गेल्या 7 वर्षांपासून शेतकरी धनाजी बचाटे मेथीची शेती करत आहे. एकरी दहा ते बारा हजार रुपये मेथी लागवडीला खर्च येतो आणि त्यातून 80 हजार ते 3 लाख रुपयांचे उत्पन्न शेतकरी धनाजी बचाटे यांना मिळत आहे.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : मेथी ही भाजी अनेकांच्या आवडीची असते. त्यामुळे दैनंदिन आहारात मेथीचा वापर होतो. या कारणामुळे मेथीला वर्षभर चांगली मागणी असते. हीच मागणी लक्षात घेता गेल्या 7 वर्षांपासून शेतकरी धनाजी बचाटे मेथीची शेती करत आहे. एकरी 10 ते 12 हजार रुपये मेथी लागवडीला खर्च येतो आणि त्यातून 80 हजार ते 3 लाख रुपयांचे उत्पन्न शेतकरी धनाजी बचाटे यांना मिळत आहे.
advertisement
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वरकुटे हे धनाजी बचाटे यांचे गाव आहे. गेल्या 7 वर्षांपासून धनाजी हे मेथीची शेती करत आहेत. एका एकरात मेथी लागवडीला 10 ते 12 हजार रुपये खर्च येतो. मेथी हे कमी कालावधीचे भाजीपाला पिक असून कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा पीक आहे. मेथीच्या भाजीला बाजारात दररोज मागणी असल्यामुळे शेतकरी धनाजी बचाटे हे वर्षानुवर्षे मेथीची लागवड करत आहे.
advertisement
डाळिंब शेती सोडून तरुणाने केली टोमॅटोची शेती, पहिल्याच तोड्यात घेतले 1 लाखाचे उत्पन्न
मेथीची लागवड केल्यानंतर 22 दिवसात मेथी तोडणीला सुरुवात होते. प्रत्येक हंगामानुसार त्या त्या व्हरायटीच्या बियाणे आणून मेथीची लागवड करत आहे. साधारणपणे सर्व खर्च वजा करता 80 हजार रुपये ते 3 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न शेतकरी धनाजी बचाटे यांना मेथी विक्रीतून मिळत आहे.
advertisement
बाजारात मेथीला योग्य भाव असल्यास कमीत कमी 8 ते 30 रुपये किंमतीला एका पेंडीची विक्री होते. सध्या मेथीला बाजारात 10 ते 12 रुपयेपर्यंत एका पेंडीची किंमत आहे. एका एकरमधून 9 ते 10 हजार पेंड्या मेथीचे निघतात. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मेथी किंवा कोथिंबीरची लागवड करावी. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवायचे असेल तर शेतकऱ्यांनी मेथीची लागवड करावी, असे आवाहन प्रयोगशील शेतकरी धनाजी बचाटे यांनी केले आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
December 20, 2024 3:14 PM IST