Farmer Success Story: फिरण्यासाठी गेले, नजरेस पडली ड्रॅगन फ्रूटची शेती, शेतकरी आता कमतोय 10 लाखांचं निव्वळ उत्पन्न, Video

Last Updated:

Farmers Success Story: ड्रॅगन फ्रूट हे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. अनेक शेतकरी ड्रॅगन फ्रूट शेतीमधून चांगला आर्थिक फायदा मिळवत असल्याचे पाहायला मिळते.

+
News18

News18

जालना: ड्रॅगन फ्रूट हे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. अनेक शेतकरी ड्रॅगन फ्रूट शेतीमधून चांगला आर्थिक फायदा मिळवत असल्याचे पाहायला मिळते. जालन्यातील साळेगाव येथील विठ्ठल डिखुळे हेदेखील मागील तीन वर्षांपासून ड्रॅगन फ्रूटच्या शेतीमधून एकरी 8 ते 10 लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळवत आहेत. पाहुयात कशा पद्धतीने करतात हे शेतकरी ड्रॅगन फ्रूट शेतीचे नियोजन.
कोल्हापूर-सोलापूर भागामध्ये फिरण्यासाठी गेल्यानंतर डिखुळे यांच्या नजरेस ड्रॅगन फ्रूटचा बगीचा पडला. आता म्हणून त्यांनी या बागेची माहिती मिळवली. काहीतरी नवीन करायचं म्हणून 2019 मध्ये आपल्या एक एकर शेतात अकरा बाय आठ अंतरावर ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. रोपांची लागवड करण्याआधी यासाठी आवश्यक असलेले स्ट्रक्चर उभे केलेस्ट्रक्चर उभे करण्यासाठी त्यांना साडेतीन लाख रुपये खर्च आला.
advertisement
अवघ्या 13 महिन्यामध्ये त्यांना उत्पादन मिळण्यास सुरुवात झालीपहिल्या वर्षी दोन ते तीन क्विंटल उत्पादन मिळाले. त्यानंतर दुसऱ्या वर्षी तीन ते चार क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. हळूहळू उत्पादन वाढत गेले. 2023 मध्ये त्यांना तब्बल 43 क्विंटल उत्पादन मिळालेयातून त्यांचे 5 लाख रुपये निव्वळ उत्पन्न झाले.
advertisement
2024 मध्ये एका एकरात तब्बल 83 क्विंटल विक्रमी उत्पादन त्यांनी आपल्या एक एकर शेतात मिळवले. त्यामधून त्यांना 8 ते 10 लाख रुपये मिळाले. देखील त्यांच्या शेतातील झाडांवर बहरदार ड्रॅगन फ्रूट लगडले असून 100 क्विंटलपर्यंत उत्पादनाची अपेक्षा विठ्ठल डिखुळे यांनी व्यक्त केली आहे.
म्हणजे बाजारात थेट विक्री न करता ते रस्त्याच्या कडेला स्टॉल लावून या ड्रॅगन फ्रूटची शंभर ते दीडशे रुपये प्रति किलो या दरम्यान विक्री करतात. यामुळे उत्पादनात दुपटीने वाढ झाल्याचे डिखुळे आवर्जून नमूद करतात. शेतीमध्ये पिकवण्याबरोबरच ते विकण्याचे व्यवस्थापन जमले तर शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होऊ शकतो हेच डिखुळे यांनी सिद्ध करून दाखवले.
मराठी बातम्या/कृषी/
Farmer Success Story: फिरण्यासाठी गेले, नजरेस पडली ड्रॅगन फ्रूटची शेती, शेतकरी आता कमतोय 10 लाखांचं निव्वळ उत्पन्न, Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement