Ration Card : राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'या' शेतकऱ्यांना रेशन ऐवजी थेट पैसे मिळणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभाग तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल (केशरी) रेशनकार्डधारक शेतकऱ्यांसाठी अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेस मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत मिळणार आहे.
मुंबई: महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभाग तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल (केशरी) रेशनकार्डधारक शेतकऱ्यांसाठी अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेस मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत मिळणार आहे.
महत्वाचे वैशिष्ट्ये काय आहे?
सदर योजनेची सुरूवात ही जानेवारी 2023 पासून सुरू करण्यात आली आहे.आरंभीची रक्कम दरमहा 150 रुपये प्रति लाभार्थी होती. आता सुधारित रक्कम 20 जून 2024 पासून दरमहा 170 रुपये प्रति लाभार्थी अशी करण्यात आली आहे.
लाभ कोणाला मिळणार?
योजनेचा लाभ छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व तसेच वर्धा जिल्ह्यातील विपत्तीग्रस्त केशरी रेशनकार्डधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे. या रकमेचा थेट हस्तांतरण डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे केली जाणार आहे.
advertisement
अर्ज कुठे कराल?
लाभार्थी व्यक्ती ही अर्ज त्यांच्या स्थानिक स्वस्त धान्य दुकान करू शकतात.
आवश्यक कागदपत्रे कोणती?
बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकीत प्रत
रेशनकार्डच्या पहिल्या व शेवटच्या पानाची प्रत
दरम्यान, राज्यातील 14 जिल्ह्यांतील केशरी रेशनकार्डधारक शेतकऱ्यांसाठी या योजनेसाठी नवीन लेखाशिर्ष प्रस्तावित करण्यात आला असून, शासनाने याला अंतिम मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नियमित आर्थिक मदत मिळेल, ज्यामुळे त्यांचे आर्थिक स्थैर्य मजबूत होईल. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज सादर करावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 08, 2025 8:25 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
Ration Card : राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'या' शेतकऱ्यांना रेशन ऐवजी थेट पैसे मिळणार






