50 टक्के अनुदानावर मिळणार ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र आणि बरंच काही, शेतकऱ्यांनो नेमकं काय करालं?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून जिल्हा परिषद उपकर योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे 50 टक्के अनुदानावर कृषी औजारांसाठी अनुदान देण्यात येणार आहे.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : शेतकऱ्यांना शेती करताना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. कधी अस्मानी, कधी दुष्काळ तर कधी बाजार भावामुळे शेतकऱ्याचे आर्थिक गणित नेहमीच कोलमडते. त्यामुळे मराठवाडा, विदर्भात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण लक्षणीय आहे. तर दुसरीकडे शासन शेतकऱ्यांच्या समस्या कमी करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करत असते.
जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध कृषी यंत्रांसाठी 50% अनुदानावर कृषी यंत्र मिळणार आहेत. यासाठी पंचायत समिती कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन जालना जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर पर्यंत कृषी यंत्रांसाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन केले आहे.
advertisement
Amravati News : आशा सेविका, गटप्रवर्तकांना दिलासा! जिल्ह्यातील 2198 आशा सेविकांना मिळणार सुरक्षा कवच
ही यंत्र मिळणार 50 टक्के अनुदानावर -
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून जिल्हा परिषद उपकर योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे 50 टक्के अनुदानावर कृषी औजारांसाठी अनुदान देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत पंचायत समितीमध्ये यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.
advertisement
कृषी औजारांमध्ये 50 एचपीचा ट्रॅक्टर, कडबाकुटी, ट्रॅक्टरचलित पल्टीनांगर, पेरणी यंत्र, रोटाव्हेटर आणि पीव्हीसी पाइप यांचा समावेश आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
September 10, 2024 6:08 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
50 टक्के अनुदानावर मिळणार ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र आणि बरंच काही, शेतकऱ्यांनो नेमकं काय करालं?