Amravati News : आशा सेविका, गटप्रवर्तकांना दिलासा! जिल्ह्यातील 2198 आशा सेविकांना मिळणार सुरक्षा कवच

Last Updated:

ग्रामीण भागातील नागरिक व आरोग्य विभाग यांच्यातील दुवा म्हणून ते काम करतात. आरोग्य विभागाकडून मिळालेली महत्वाची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांना देतात.

आशा स्वयंसेविका अमरावती
आशा स्वयंसेविका अमरावती
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती : आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक हे गावपातळीवर माता व बालकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करण्याचे काम करतात. महिलांना प्रसुतीपूर्व तपासणी आणि आणखी आरोग्याविषयी काही माहिती पुरवतात. त्यांना हे कर्तव्य बजावत असताना अपघात झाल्यास राज्य सरकारकडून मदत दिली जाणार आहे. आशा सेविकांसाठी विमा योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.
advertisement
आपली जबाबदारी पार पाडत असताना आशा सेविका व गटप्रवर्तक यांचा जर अपघाती मृत्यू झाला तर त्यांना किती रुपयांची मदत विम्याच्या आधारे दिली जाणार आहे? तसेच जर कायमस्वरुपी अंपगत्व आले तर किती मदत दिली जाणार आहे? याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.
कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास किती मिळणार मदत?
आशा सेविका व गटप्रवर्तक यांचा वर्किंग टाईममध्ये अपघात झाला आणि त्यांना जर यामध्ये कायमस्वरूपी अंपगत्व आले तर 5 लाख रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहेत.
advertisement
अपघाती मृत्यू झाल्यास किती मिळणार मदत?
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, आशा स्वयंसेविकांना त्यांचे कर्तव्य बजावत असताना त्यांना अपघात झाला. अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत मिळणार असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे.
advertisement
अमरावती जिल्ह्यातील 2198 आशा सेविकांना मिळणार सुरक्षा कचव
मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागाच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यामध्ये 2 हजार 198 आशा स्वयंसेवक आहेत. ग्रामीण भागातील नागरिक व आरोग्य विभाग यांच्यातील दुवा म्हणून ते काम करतात. आरोग्य विभागाकडून मिळालेली महत्वाची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांना देतात.
आशा सेविकांना हे काम करत असताना अनेक वेळा त्रास सुद्धा सहन करावा लागतो. तरीही त्यांना मिळणारे मानधन जेमतेम आहे. त्यामुळे शासनाने या सेविकांना मानधन वाढवून देण्यासोबत शासकीय सेवेत कायम स्वरुपी रुजू करावे अशी मागणी प्रफुल्ल देशमुख (सचिव, आशा व गटप्रवर्तक संघटना) यांनी केली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
Amravati News : आशा सेविका, गटप्रवर्तकांना दिलासा! जिल्ह्यातील 2198 आशा सेविकांना मिळणार सुरक्षा कवच
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement