दुध व्यवसाय सुरू करायचा आहे का? गोठा बांधण्यासाठी मिळताय 2.30 लाख रुपये, अर्ज कसा करायचा?
- Published by:Ajit Bhabad
 
Last Updated:
Gai Gotha Yojana : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबविली जाणारी ‘गाय गोठा योजना’ ही ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारी महत्वाची योजना ठरत आहे.
मुंबई : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबविली जाणारी ‘गाय गोठा योजना’ ही ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारी महत्वाची योजना ठरत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या गायी-म्हशींसाठी सुरक्षित व योग्य गोठा बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. अनुदान थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.
योजना 2021 पासून शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा एक भाग म्हणून सुरू असून, तिच्या मदतीने राज्यातील हजारो शेतकऱ्यांचा दुग्धव्यवसाय अधिक सक्षम झाला आहे.
योजनेचा मुख्य उद्देश
या योजनेचा हेतू म्हणजे शेतकऱ्यांना आधुनिक व सुरक्षित गोठा बांधण्यासाठी मदत करणे. सुयोग्य गोठ्यामुळे जनावरांना पाऊस, थंडी, उष्णता आणि प्रतिकूल हवामानापासून संरक्षण मिळते. निरोगी जनावरे अधिक दूध देतात, ज्यामुळे उत्पादनात आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते. दुग्धव्यवसायाला चालना मिळून ग्रामीण बेरोजगारी कमी करण्यास मदत होते.
advertisement
अनुदानाचा लाभ
2 ते 6 गायी/म्हशींसाठी : 77,188 रु
6 ते 18 गायी/म्हशींसाठी : 1,54,373 रु
18 पेक्षा जास्त गायी/म्हशींसाठी : 2,31,564 रु
अनुदानाचे वितरण तीन टप्प्यांत केले जाते.
योजनेच्या अटी काय?
अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी शेतकरी असावा.
अर्जदाराकडे किमान 2 जनावरे असणे बंधनकारक.
पशुपालनाचे ज्ञान असणे आवश्यक.
राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे गरजेचे.
advertisement
7/12 उतारा व 8-अ जमीन नोंद आवश्यक.
सरपंच/पोलिसपाटलाचा रहिवासी दाखला अनिवार्य.
पशुधन अधिकाऱ्याचा दाखला द्यावा लागेल.
रोजगार हमीचे प्रमाणपत्र आणि ग्रामपंचायतीचे शिफारसपत्र आवश्यक.
आवश्यक कागदपत्रे
आधारकार्ड
रहिवासी दाखला
7/12 उतारा
बँक खाते पुस्तक
जातीचा दाखला
जनावरांचे टॅगिंग प्रमाणपत्र
मनरेगा जॉब कार्ड
ग्रामपंचायतीचे शिफारसपत्र
स्थळ पाहणी अहवाल
मोबाईल नंबर व ई-मेल आयडी
advertisement
अर्जदाराचा फोटो
स्वयंघोषणापत्र
अर्ज प्रक्रिया काय आहे?
शेतकऱ्यांनी अर्ज गावातील ग्रामपंचायत कार्यालयात किंवा पंचायत समिती कार्यालयात सादर करावा. तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा पशुसंवर्धन विभागाशी थेट संपर्क साधूनही अर्ज करता येईल.
शेतकऱ्यांना होणारे फायदे
view commentsगाय गोठा योजना केवळ जनावरांच्या सुरक्षेसाठी नाही तर ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठीही महत्वाची आहे. निरोगी जनावरांमुळे दूध उत्पादन वाढते, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते आणि रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 24, 2025 1:57 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
दुध व्यवसाय सुरू करायचा आहे का? गोठा बांधण्यासाठी मिळताय 2.30 लाख रुपये, अर्ज कसा करायचा?


