मोसंबीच्या आंबिया बहाराचं नियोजन करताय? खत व्यवस्थापन महत्त्वाचे, कसं कराल? Video
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
योग्य व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांना मोसंबी पिकातून चांगले उत्पन्न देखील मिळते. मोसंबीच्या आंबिया बहाराचं नियोजन करत असताना शेतकऱ्यांनी खत व्यवस्थापन कसं करावं? जाणून घ्या.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : मराठवाड्यामध्ये मोसंबी या फळविकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये मोसंबीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. सध्या मोसंबी उत्पादक शेतकरी मोसंबीच्या आंबिया बहाराचं नियोजन करत आहे. हे नियोजन करत असताना मोसंबीची योग्य मशागत, पाणी व्यवस्थापन, कीड रोग व्यवस्थापन त्याचबरोबर खत व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे अत्यंत गरजेचे असते. योग्य व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांना मोसंबी पिकातून चांगले उत्पन्न देखील मिळते. मोसंबीच्या आंबिया बहाराचे नियोजन करत असताना शेतकऱ्यांनी खत व्यवस्थापन कसं करावं? याबद्दचं बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉक्टर संजय पाटील यांनी माहिती दिली आहे.
advertisement
मोसंबीचे खत व्यवस्थापन कसं करावं?
शेतकऱ्यांनी आंबिया बहाराचे नियोजन करत असताना मोसंबीच्या पिकाला योग्य ताण द्यावा लागतो. झाडांची योग्य मशागत करणे गरजेचे असते. यानंतर झाडांच्या खोडांना बोडोपीस लावावे. झाडांवर योग्य त्या फवारण्या कराव्यात. यानंतर आणखी एक महत्त्वाचं काम म्हणजे मोसंबीच्या झाडाला बेसल डोस म्हणजेच खताची मात्रा योग्य प्रमाणात द्यावी. पाच वर्षाच्या मोसंबीच्या झाडाला साधारणपणे 400 ग्रॅम नत्र 200 ग्राम स्फुरद आणि 200 ग्रॅम पालाश अशा पद्धतीने खत देणे आवश्यक असतं, असं संजय पाटील सांगतात.
advertisement
त्याचबरोबर पाच वर्ष वयाच्या मोसंबीच्या झाडांना 15 किलो निंबोळी पेंड आणि 50 किलो शेणखत त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य असलेली खते जमिनीच्या पोतानुसार देणे आवश्यक ठरते. झाडांना खताची मात्रा कमी पडल्यास मोसंबीच्या झाडावर वाढलेल्या काडीचे प्रमाण वाढते. यामुळे झाडाचे आयुर्मान कमी होते उत्पादकता कमी होते. त्याचबरोबर झाडे ही कीड रोगांना लवकर बळी पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोसंबीच्या झाडांना योग्य प्रमाणात खत व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचं डॉक्टर संजय पाटील यांनी सांगितलं.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Dec 14, 2024 1:47 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
मोसंबीच्या आंबिया बहाराचं नियोजन करताय? खत व्यवस्थापन महत्त्वाचे, कसं कराल? Video





