12 वी झाली अन् घेतली म्हैस! घरातूनच करतोय लाखात कमाई, शेतकऱ्याच्या पोराचा नादच खुळा!

Last Updated:

Buffalo Farming: बारावी पास तरुणाने नोकरीच्या मागे न लागता एक म्हैस घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरू केला. आता त्याची महिन्याची कमाई 40 हजार रुपये आहे.

+
12

12 वी झाली अन् घेतली म्हैस! घरातूनच करतोय लाखात कमाई, शेतकऱ्याच्या पोराचा नादच खुळा!

नारायण काळे, प्रतिनिधी
जालना: ‘इच्छा तिथे मार्ग’ अशी म्हण आपण नेहमीच वापरतो. परंतु, अनेक जण या म्हणीचा केवळ वापर न करता ती सत्यात उतरवून दाखवतात. त्यापैकीच एक म्हणजे जालना जिल्ह्यातील श्रावण काळे हा युवक. शिक्षण घेत त्याने केवळ एका म्हशीपासून सुरू केलेला दुग्ध व्यवसाय वार्षिक 3 ते 4 लाख रुपये निव्वळ नफा कमावण्यापर्यंत वाढवला आहे. ग्रामीण भागातील तरुण केवळ नोकरीच्या मागे न धावता शेतीपूरक उद्योग व्यवसायातूनही चांगली आर्थिक प्रगती करत आहे. श्रावण काळे याने हेच दाखवून दिले आहे. याबाबतच आपण लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
श्रावण सत्यनारायण काळे हा युवक जालना जिल्ह्यातील दहिफळ या छोट्याशा गावातील रहिवासी आहे. बारावी झाल्यानंतरच त्याने स्वतःचा काहीतरी व्यवसाय करायचा असं ठरवलं होतं. घरी वडिलोपार्जित शेती असल्याने शेतीपूरक व्यवसायात उतरण्याचा निश्चय त्याने केला. 20  हजार रुपये किमतीच्या एका म्हशी पासून त्याने हा व्यवसाय सुरू केला. सोबतच कॉलेजचे शिक्षण देखील सुरू होते. हळूहळू दुधाच्या पैशातून दोन-तीन अशा वाढवत आता हा व्यवसाय 6 मशींपर्यंत पोहोचला आहे.
advertisement
श्रावण आपल्या म्हैस पालनातून दिवसभरात 35 लिटर पर्यंत दूध डेअरीला घालतो. या दुधाला 55 ते 60 रुपये एवढा सरासरी दर मिळतो. त्यामुळे दिवसाला दीड ते 2 हजार रुपयांची कमाई हमखास होते. व्यवसाय वाढल्यानंतर 50 हजार रुपये खर्च करून म्हशीच्या निवाऱ्यासाठी शेड तसेच 21 हजार रुपये खर्च करून कडबाकुटी मशीन विकत घेतली आहे. सध्या केवळ 3 म्हशी दूध देत असल्याने दिवसभरात 20 ते 22 लिटर दूध निघतं. त्यातून महिन्याला 35 ते 36 हजार रुपये मिळतात. तर वार्षिक 3 ते 4 लाख रुपये निव्वळ नफा होत असल्याचे श्रावण काळे याने सांगितले.
advertisement
दरम्यान, ग्रामीण भागातील तरुणांनी देखील उद्योग व्यवसायाकडे वळले पाहिजे. शेती करणाऱ्या तरुणांनासाठी शेतीला पुरक म्हणून दुग्ध व्यवसाय उत्तम आहे. व्यवस्थित नियोजन केले आणि प्रामाणिक कष्ट केले तर या व्यवसायात चांगली कमाई होते. त्यामुळे तरुणांनी या व्यवसायाकडे वळावं, असं आवाहनही श्रावण करतो.
मराठी बातम्या/कृषी/
12 वी झाली अन् घेतली म्हैस! घरातूनच करतोय लाखात कमाई, शेतकऱ्याच्या पोराचा नादच खुळा!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement