100 रुपये घेऊन काय करू? शेतकऱ्याचा संताप, बाजारात रस्त्यावरच टाकली कोथिंबीर!

Last Updated:

Coriander Price: व्यापाऱ्यांनी एक गोणी कोथिंबीरीला केवळ 100 रुपयाला मागितलं. 100 रुपये घरी घेऊन जाऊन काय करू?, अशा संतप्त भावना शेतकऱ्याने व्यक्त केल्या.

+
100

100 रुपये घेऊन काय करू? शेतकऱ्याचा संताप, बाजारात रस्त्यावरच टाकली कोथिंबीर!

नारायण काळे, प्रतिनिधी
जालना: आस्मानी आणि सुलतानी संकटांनी आधीच अडचणीत असलेला बळीराजा बाजारात पडलेल्या बाजारभावामुळे देखील नागावला जात आहे. जालना जिल्ह्यातील वाटुर फाटा येथील एका शेतकऱ्याने कोथिंबिरीला मिळत असलेल्या अत्यल्प दरामुळे कोथिंबीर चक्क रस्त्यावर झोकली आहे. बाजारात विक्रीस आलेल्या कोथिंबीरीला केवळ 100 रुपये प्रति गोणी असा दर मिळाल्याने शेतकरी अंबादास माने यांचा संताप अनावर झाला. त्यामुळे वाटुर फाटा येथील आठवडी बाजारातच कोथिंबीर रस्त्यावर फेकून दिली. तसेच मिळत असलेल्या कमी दरामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. पाहुयात.
advertisement
मागील महिनाभरापासून संपूर्ण राज्यामध्ये भाजीपाल्याचे दर घसरल्याचे पाहायला मिळत आहे. टोमॅटो गोबी वांगी यासारखा भाजीपाला दहा ते पंधरा रुपये प्रति किलो या दराने विक्री होत आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी टोमॅटो आणि कोबी रस्त्यावर फेकल्याच्या घटना देखील मिळाल्या. त्यातच आता कोथिंबिरीचे दर देखील गडगडले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या वाटो फाटा येथील अशोक माने या शेतकऱ्याने आपली संपूर्ण कोथिंबीर रस्त्यावर फेकून संताप व्यक्त केलाय.
advertisement
घर खर्च भागवा म्हणून अंबादास यांनी आपल्या शेतामध्ये 10 गुंठे क्षेत्रावर कोथिंबीरीची लागवड केली होती. कोथिंबीरीला सुरुवातीच्या काळामध्ये समाधानकारक दर मिळाला. मात्र बाजारात सर्वच भाजीपाल्याचे दर कोसळलेले असल्याने कोथिंबिरीला देखील अत्यल्प दर मिळायला लागला. यातच माने यांनी गुरुवारी बाजारात विक्रीस आणलेल्या कोथिंबीरीला व्यापाऱ्याने केवळ 100 रुपयात मागितले. याचाच राग अनावर झाल्याने अंबादास माने यांनी आणलेली एक गोणी कोथिंबीर रस्त्यावरच टाकून देत आपला संताप व्यक्त केला.
advertisement
100 रुपयांचं काय करू?
“शंभर रुपयांमध्ये आज काय येते? या कोथिंबीरीच्या पैशातून ना मीठ, ना मिरची, साखर येते. किमान 400 - 500 रुपये तरी या कोथिंबीरीची किंमत असायला हवी होती. पण व्यापाऱ्यांनी या एक गोणी कोथिंबीरीला केवळ 100 रुपयाला मागितलं. 100 रुपये घरी घेऊन जाऊन काय करू? त्यापेक्षा रस्त्यावर फेकलेलीच बरी,” अशा संतप्त भावना अंबादास माने या शेतकऱ्याने व्यक्त केल्या.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
100 रुपये घेऊन काय करू? शेतकऱ्याचा संताप, बाजारात रस्त्यावरच टाकली कोथिंबीर!
Next Article
advertisement
BMC Election : स्वाभिमानावर आघात, हा अपमान मी कदापि सहन करणार नाही, रामदास आठवले संतापले
''स्वाभिमानावर आघात...हा अपमान मी कदापि सहन करणार नाही'', रामदास आठवले संतापले
  • भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जागा वाटपाची चर्चा झाली असली तरी महायुतीचे घटक पक्ष

  • रिपब्लिकन पार्टी आठवले गटामध्ये भाजप विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

  • केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपला संताप व्यक्त केला आ

View All
advertisement