BMC Election : स्वाभिमानावर आघात, हा अपमान मी कदापि सहन करणार नाही, रामदास आठवले संतापले

Last Updated:

Ramdas Athawale On Seat Sharing : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्यास आता काही तासच शिल्लक आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जागा वाटपाची चर्चा झाली असली तरी महायुतीचे घटक पक्ष मात्र दुर्लक्षित असल्याचे दिसून आले आहे.

''स्वाभिमानावर आघात...हा अपमान मी कदापि सहन करणार नाही'', रामदास आठवले संतापले
''स्वाभिमानावर आघात...हा अपमान मी कदापि सहन करणार नाही'', रामदास आठवले संतापले
मुंबई: महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्यास आता काही तासच शिल्लक आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जागा वाटपाची चर्चा झाली असली तरी महायुतीचे घटक पक्ष मात्र दुर्लक्षित असल्याचे दिसून आले आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी आठवले गटामध्ये भाजप विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
रामदास आठवले यांनी महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षासाठी जागा सोडण्याची मागणी केली होती. आठवले यांची भाजपसोबत युती आहे. मात्र, राज्यातील काही महापालिकांमध्ये आठवले गटाला जागा सोडण्यात आल्या नाहीत. पुण्यात रिपाइंला जागा सोडताना उमेदवारही परस्पर जाहीर केल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता.

रामदास आठवले संतापले...

जागा वाटपात रिपाइंला डावल्यात आल्याचे समोर आल्यानंतर रामदास आठवले यांनी संताप व्यक्त केला आहे. महायुतीच्या स्थापनेपासून आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे आणि खंबीरपणे सोबत राहिलो आहोत, मात्र आज जागावाटपाच्या बाबतीत जो प्रकार घडला आहे, तो निव्वळ विश्वासघात असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले.
advertisement
advertisement
जागा वाटपाच्या चर्चेसाठी काल दुपारी ४ वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती, मात्र मित्रपक्षांकडून त्याचेही पालन करण्यात आले नाही. हा प्रकार म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय नसून आमच्या स्वाभिमानावर केलेला आघात आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना कार्यकर्त्यांचा हा अपमान मी कदापि सहन करणार नाही. त्यामुळेच आज माझे कार्यकर्ते जो काही निर्णय घेतील, तो मला पूर्णपणे मान्य असेल असेही आठवले यांनी म्हटले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election : स्वाभिमानावर आघात, हा अपमान मी कदापि सहन करणार नाही, रामदास आठवले संतापले
Next Article
advertisement
BMC Election : स्वाभिमानावर आघात, हा अपमान मी कदापि सहन करणार नाही, रामदास आठवले संतापले
''स्वाभिमानावर आघात...हा अपमान मी कदापि सहन करणार नाही'', रामदास आठवले संतापले
  • भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जागा वाटपाची चर्चा झाली असली तरी महायुतीचे घटक पक्ष

  • रिपब्लिकन पार्टी आठवले गटामध्ये भाजप विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

  • केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपला संताप व्यक्त केला आ

View All
advertisement